मातोश्रीवर दंगा करणारी 'ती' एकनाथ शिंदेंची माणसं! सुपारीचे खेळ वर्षा बंगल्यावर चालतात - संजय राऊत
मातोश्रीबाहेर दंगा करणारी ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाडोत्री माणसं होती. सुपारीचे सर्व खेळ वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयाच्या सहाव्या माळावर चालत आहेत. ठाण्यातून सुपाऱ्या चालवल्या जात आहेत असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मातोश्रीबाहेर वक्फ बोर्डाच्या बिलाच्या निमित्ताने जे लोक जमले आणि त्यांनी घोषणाबाजी केली ती सर्व भाडोत्री लोक होती. दिल्लीचा अहमदशहा अब्दाली महाराष्ट्रात मराठी माणसांत भांडणं लावायचा प्रयत्न करत आहे असा आरोपही यावेळी त्यांनी केला.

संजय राऊतांनी दाखवले पुरावे
संजय राऊत यांनी मातोश्रीबाहेर आंदोलन करणाऱ्या व्यक्तींचे फोटो आणि त्याच व्यक्तींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे फोटोसह पुरावे माध्यमांसमोर दाखवले आहेत. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली परखड मतं मांडली.
आम्हाला कशाला लुटणाऱ्यांना आव्हान द्या
संजय राऊत म्हणाले, अहमद शहा अब्दाली मराठी माणसांत भांडण लावायचा प्रयत्न करत आहे. जे पाणीपतावर झालं, तेच आता करण्याचा प्रयत्न आहे. त्याला हे सर्व सुपारीबाज बळी पडत आहेत. जो महाराष्ट्र लुटतो आहे, मराठी अस्मिता पायाखाली तुडवतोय आणि महाराष्ट्राची लूट सुरुआहे. त्याला आव्हान द्या. आम्हाला कसले आव्हान देता आहात, आम्ही समर्थ आहोत. हिंमत असेल तर त्याला आव्हान द्या.
तिकडे का शेपट्या घालता
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र लुटणाऱ्या अहमदशहा अब्दाली आणि त्यांच्या सुपारीघगँगला लुटण्याची भाषा करा. हिंमत असेल तरच..तिकडे शेपट्या घालता. सलमान शेख हा मातोश्रीच्या बाहेर होता. हेच महाशय कुणाबरोबर आहे हे पाहा. हा अफराब सिद्दीकी हा मातोश्रीबाहेर घोषणा देत होता हा कुणाबरोबर आहे हे बघा असे म्हणत संजय राऊत यांनी दोघांचेही एकनाथ शिंदेंसोबतचे फोटो दाखवले.
त्यांची सर्व फॅमिली सुपारीबाज
संजय राऊत म्हणाले, इलियास शेख नावाचा सर्वात जास्त मातोश्रीसमोर बोलत होता त्याचा फोटो कुणाबरोबर आहे हे बघा असे सगळे भाडोत्री लोकं, हे अक्रम शेख आंदोलनात होते हे कुणाबरोबर आहेत तर एकनाथ शिंदेंसोबत याशिवाय निशांत चौधरी हे वर्षा बंगल्यावर मिसेस मुख्यमंत्रींसोबत दिसत आहेत म्हणजे ते संपूर्ण फॅमिली सुपारीबाज आहेत.
नरेश म्हस्के यांचे आरोपाला उत्तर
नरेश म्हस्के म्हणाले की, संजय राऊत मुख्य मुद्द्यांपासून बाजूला जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते समाजात काम करतात, ते सर्वांसोबत असू शकतात, ते आमच्याकडेही येऊ शकतात. परंतु, त्या दिवशी संसदेत वक्फ बोर्डाचा ज्यावेळी सुधारणेसंदर्भात विषय आला तेव्हा सभागृहातून ठाकरेंच्या खासदारांनी पळ काढला. स्वतःची भुमिका स्पष्ट केली नाही. अनिल देसाईंसारखे यांचे सचिव आणि खासदार हजर होते. त्या बिलासंदर्भात त्यांनी काय भुमिका घेतली हे माहीत आहे. बाळासाहेब ठाकरेंनी वक्फ बोर्ड रद्द करायचे सांगितले पण हे मात्र सपोर्ट करत आहेत.












Click it and Unblock the Notifications