फोडलेल्या आमदारांना 50-50 कोटी दिले, शहांना भ्रष्टाचार नको तर फडणवीसांना अटक करा - संजय राऊत

मुंबई - अमित शहांनी शरद पवारांसह मविआवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, मात्र देवेंद्र फडणवीसांनी २० आमदार ५०-५० कोटी रुपये देऊन फोडले. शहांना भ्रष्टाचार नको असेल तर देवेंद्र फडणवीसांना अटक करा असा पावित्रा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी घेतला.

आम्हाला घाबरवू नका

संजय राऊत अमित शहांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही आम्हाला घाबरवू नका.तुमचा पक्ष, सरकार भ्रष्टाचारातून आले आहे. पैसा फेको तमाशा देखा असा तुमचा खेळ आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात की, २० आमदार फोडले चिंचोके देऊन फोडले का? असा सवालही त्यांनी केला.

Sanjay Raut on Amit Shah over corruption

फडणवीसांची इडी, सीबीआय चौकशी करा

पैसे देऊन फोडले, केंद्रीय गृहमंत्र्यांना भ्रष्टाचार नको ना मग अटक करा देवेंद्र फडणवीसांना किती पैसे दिले याची चौकशी करा. देवेंद्र फडणवीस यांची इडी,सीबीआय चौकशी करा. २० आमदार फोडले हे गर्वाने सांगतो ही त्यांची लायकी, राज्याचा गृहमंत्री सांगतो आमदार फोडले दही भात देऊन फोडले का..पैसे दिले त्यांना. ५० -५० कोटी रूपये दिले त्यांना. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदें, अजित पवारांनी पैसे आणले कुठून हे जर तुम्ही बोलणार आहात तर अमित शहांना भ्रष्ट्राचारावर बोलण्याचा अधिकार आहे.

त्या श्रोत्यांची किव येते...

संजय राऊत यांनी अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या भष्टाचाराच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. ''एका हरलेल्या आणि घाबरलेल्या नेत्याची ही विधाने आहेत. पुण्यात जे लोकं व्यासपीठावर आणि समोर बसले होते त्यांनी अमित शहा यांच्या शरद पवारांवरील वक्तव्यावर टाळ्या वाजवल्या. मला त्या सर्व श्रोत्यांची कीव येते. शरद पवार यांच्यावर आरोप ज्यांच्यामुळे केले ते प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आज अमित शहांच्या मांडीला मांडी लावून बसतात. याबाबत अमित शहांना माहित नाही का? त्यांच्या बाजूला अशोक चव्हाणही होते. त्यांच्यावर अमित शहांनीच आरोप केले होते.

महाराष्ट्रातील पराभव शहांच्या जिव्हारी

अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख अशी टीका केली होती. यावरूनही राऊत कडाडले आहेत. ''आम्ही जिन्ना फॅन्स क्लबमध्ये सामील नाहीत. पाकिस्तानात जाऊन जिन्ना यांच्या कबरीवर फुले उधळणारे आम्ही नाहीत.

पाकिस्तानात नवाब शरीफ यांचा केक कापण्यात आणि खाण्यात आम्हाला इंटरेस्ट नव्हता. देशातील प्रखर राष्ट्रवादी मुस्लिमांची बाजू मांडण्यात चुकीचे काहीच नाही. महाराष्ट्रातील पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. लोकसभा प्रचारातही अमित शहांनी आरोप केले. मात्र तरीही जनतेने त्यांचा पराभव केला. गुजरातच्या व्यापाऱ्यांना महाराष्ट्र लुटू देणार नाही हा संदेश जनतेने दिला आहे. त्याचा आक्रोश आज ते करत आहेत'', असे राऊत म्हणाले.

काय म्हणाले होते अमित शहा?

"सर्वात मोठे भ्रष्टाचारी शरद पवार आहेत. ते आमच्यावर काय आरोप करतात, या देशात भ्रष्टाचाराला संस्थागत करण्याचे काम जर कुणी केले तर ते शरद पवारांनी केले. आमच्यावर ते भ्रष्टाचाराचे आरोप लावत आहेत. यावेळी शरद पवार तुमच्या खोटेपणाला माझे कार्यकर्ते जाणून आहेत.

घरघर जाऊन आपल्याविरोधात खोटे बोलणाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि विरोधकांचा पर्दाफाश करा. मी सर्व कार्यकर्त्यांना सांगतो की, स्वतःला झोकून द्या आणि कमळाचे फुल उमलण्यासाठी प्रयत्न करा.एक-एक कार्यकर्ता कमळाला समर्पित व्हावा. परिश्रमाची शिकस्त करावी," असे काल अमित शहा म्हणाले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+