देश आक्रोश करतोय पंतप्रधानांच्या सेलिब्रिटींसोबत 9 तास गप्पा! सत्ताधारी-विरोधकांवर संजय राऊतांचा वार
Sanjay Raut criticizes PM Modi Amit Shah and opposition : पहलगाम हल्ल्यानंतर देश आक्रोश करत असताना 9 तास पंतप्रधान सिनेकलाकारांसोबत गप्पा मारतात, बिहार निवडणुकीसाठी सभा घेतात. त्यांनी पंधरा दिवस अशा गोष्टी करायला नको होत्या, हे कसले नैतृत्व आणि त्यांचे विरोधक जे आमच्यासोबत आहेत ते सरकाला समर्थन देत आहेत अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी निशाना साधला.
संजय राऊत आज माध्यमांशी संवाद साधत होते. ते म्हणाले, 24 तास राजकारणात जे आहेत ते आमदार खासदार पक्ष फोडत आहेत. आता जे पहलगाम, उरी, पुलवामामध्ये झाले त्याला देशाचे गृहमंत्री जबाबदार आहे, हे विरोधकांना समजायला हवे, ते गृहमंत्र्यांना का समर्थन देत आहेत.

पंतप्रधानांच्या सेलिब्रिटींसोबत गप्पा
संजय राऊत म्हणाले, घरा-घरात आक्रोश आहे आणि आपले पंतप्रधान चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रेटींसोबत मस्त चर्चा करत आहेत, कार्यक्रम घेत आहेत. त्याचे श्रेय भारतीय सेनेला द्यावे लागेल कारण ते सीमेवर लढायला बसले आहेत आणि पंतप्रधानमंत्री फिरत आहेत.
दहा वर्ष चुका करणाऱ्या सरकारला कशाला द्यायचे समर्थन?
संजय राऊत म्हणाले, सरकार पोकळ आहे. सरकारला समर्थन द्यायला हवे पण दहा वर्षात ज्या चुका सरकारने केल्या आहेत, त्यांना या मुद्द्यावर काय समर्थन द्यायचे असा सवालही संजय राऊत यांनी केला.
सरकारचे म्हणजे तुम्ही लढा आम्ही कपडे सांभाळतो..
संजय राऊत म्हणाले, राजकीय इच्छाशक्तीचा निर्णय असतो, याची जबाबदारी आपण स्वःतवर घ्यायला हवी. तुम्हाला पावर दिले तुम्ही बघा..तुम्ही लढा आम्ही कपडे सांभाळतो श्रेय मी घेईल गडबड झाली तर तुमची जबाबदारी असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. याला राजकीय नैतृत्व म्हणत नाही, उलट 1971 चे युद्ध आम्ही पाहिले, तेव्हा आम्ही इंदिरा गांधींना भेटलो होतो, लीडरशीप काय असते ते त्यांच्याकडे पाहून कळते.
लीडरशीप इंदिरा गांधींसारखी हवी..
संजय राऊत म्हणाले, मानिकशहा यांना इंदिराजींनी विचारले होते की, मला पाकिस्तानसोबत युद्ध हवे आहे, तुमची तयारी काय..? युद्ध हवे हा राजकीय निर्णय आहे जो इंदिराजींचा होता. पुलवामानंतरचा आपण केलेला हल्ला हा एकच अपवाद आहे. पंतप्रधान तर बिहार प्रचार आणि चित्रपट क्षेत्रातील लोकांत दंग आहेत, ही समस्या आपल्या नैतृत्वाची आहे आणि लोक टाळ्या वाजवत आहेत.
राऊतांनी इंडिया आघाडीचा घेतला समाचार
संजय राऊत म्हणाले, 9 तास पंतप्रधान सिनेकलाकारांसोबत मस्त गप्पा मारतात हे कशासाठी? पहलगाम हल्ल्यानंतर 15दिवस पंतप्रधानांनी असे कार्यक्रम घ्यायला नको होते, देशाचा, सुरक्षेचा आणि काश्मीरचा विचार त्यांनी करायला हवा होता. आमचे नैतृत्व हे करत नाही आणि त्यांचे विरोधक या मुद्द्यावर सरकारला समर्थन देत आहे.
गृहमंत्र्यांनी राजीनामा का दिला नाही?
उरी ते पुलावामा पर्यंत जे हल्ले झाले त्याला गृहमंत्रालय जबाबदार आहे, त्यांना आता बोलण्याचा अधिकार नाही. हल्ल्यानंतर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा होता जर ते खरे देशभक्त असेल तर त्यांनी आधी राजीनामा द्यायला हवा होता. पहलगाम हल्ल्यानंतर जर बडतर्फी आणि निलंबन कुणाचे व्हावे तर ते देशाच्या गृहमंत्र्यांचे व्हायला हवे असेही राऊत म्हणाले.












Click it and Unblock the Notifications