संजय राऊत म्हणाले-15 वर्षे शिक्षा ठोठावली तरी, सत्य बोलण्याचे थांबणार नाही
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना कोर्टाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद आणि 25 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे," मला 15 वर्षे शिक्षा ठोठावली तरी मी सत्य बोलण्याचे थांबणार नाही", असे संजय राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत म्हणाले की, मी फक्त जनतेच्या पैशाचा अपहार होतोय का प्रश्न विचारला होता यात अब्रुनुकसानी कुठे होते? मीरा-भाईंदरमधील शौचालयचे कंत्राट युवक प्रतिष्ठानला दिले होते. पण महापालिकेतील विरोधी नेते प्रवीण पाटील यांनी या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला, त्यानंतर पालिकेन देखील एक अहवाल दिला. हा मु्द्दा आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत मांडला, त्यावर विधानसभेत चौकशी मागणी करुन अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला.

राज्य सरकारने ही चौकशी आदेश दिले होते. यानंतर मी यावर बोललो तर डिफरमेशन होते कुठे? तरीही आम्ही कोर्टाचा आदर करतो, आम्ही सेशन कोर्टात पुरावे घेऊन जाऊ असे संजय राऊत म्हणाले. त्यांनी मला 15 वर्षे शिक्षा ठोठावली तरी मी सत्य बोलण्याचे थांबणार नाही. जनतेच्या पैशाचा अपहार होतोय यावर हे आम्ही काहीच बोलायचे नाही? असं चालणार नाही.
निवडणुका आल्या की आमच्या विरोधात कारस्थान
ज्या देशात पंतप्रधान मुख्य न्यायाधीशांची घरी गणपतीचे मोदक खायला जातात तिथे आम्हाला न्याय मिळणार कुठे? अण्णाभाऊ साठेंनी एकदा म्हटले होते की, न्यायव्यवस्था कुणाची रखेल झाली आहे, पण मी तसं म्हणणार नाही आम्ही न्यायालयाचा आदर करतो. लोकसभा निवडणुकीआधी राहुल गांधींनाही असा त्रास देण्यात आला. आता विधानसभा निवडणुका आल्या की आमच्या बाबतीतही तेच घडत आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावरही टीका करत म्हटले की, ते जेव्हा आमच्यावर घाणेरडे आरोप करतात ते मात्र डिफरमेशन होत नाही का? जर मला तुरुंगात पाठवण्याचा प्लॅन करत असतील तर मी तयार आहे पण सत्य बोलल्याशिवाय राहणार नाही.
काय आहे शौचालय घोटाळा?
मिरा भाईंदर शहरात एकूण 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यातील 16 शौचालये बांधण्याच कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करुन, मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केली. तसेच साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत विधानसभेत आवाज उठवलेला होता. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करुन, अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. त्यामुळे ज्या ठिकाणी शौचालय बांधण्यात आले आहे, त्या जागेची पाहणी वनविभागाने सुरु केली होती.
राऊत यांनी आपण लवकरच सोमय्या कुटुंबाचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार असून यामध्ये 100 कोटींहून अधिकचा अपहार झाल्याचा आरोप केला होता. "युवा प्रतिष्ठान नावाची जी काही संस्था चालवत होते हे आणि यांचं कुटुंब त्यांनी शेकडो कोटींचा टॉयलेट घोटाळा केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला












Click it and Unblock the Notifications