देवेंद्र फडणवीसांचे डोके ठिकाण्यावर आहे का?, निवडणुका आल्यावरच यांना धर्म आठवतो- संजय राऊत
Maharashtra Assembly Election 2024 : ही विधानसभा निवडणूक आहे. महाराष्ट्रामध्ये एकच धर्म आहे आणि तो धर्म म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र धर्म. या धर्मामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सारखे लोक नाहीत. त्यांचा तर एकच धर्म आहे तो म्हणजे हिंदू - मुसलमान. निवडणुकांची वेळ आल्यानंतरच त्यांना हिंदू मुस्लिम धर्माच्या गोष्टी आठवतात. पण फडणवीस यांचे डोके ठिकाणार आहे का?, असा सवाल देखील राऊत यांनी केला.
आधी पाक व्याप्त काश्मीरात झेंडा फडकवा
देवेंद्र फडणवीस हे धर्मयुद्ध असल्याचे म्हणत आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांचे डोके ठिकाणावर आहे का?, आपण असेच एक राहिलो तर पाकिस्तानवर तिरंगा फडकवू असा दावा ते करत आहेत. पाकिस्तानावर तिरंगा फडकवायचे तर राहू द्या. आधी पाक व्याप्त काश्मीरमध्ये तिरंगा फडकवून दाखवा, अशा शब्दात संजय राऊत यांनी त्यांना आव्हान दिले आहे. हिम्मत असेल तर मणिपूरला जाऊन, इंफाळला जाऊन तिरंगा फडकवून दाखवा, असा आव्हान देखील संजय राऊत यांनी दिले आहे.

लडाखच्या पुढे चीन घुसला आहे. त्या ठिकाणी जाऊन चीन व्याप्त भूमीवर जाऊन तिरंगा फडकवून दाखवा, असे आव्हान देखील संजय राऊत यांनी दिले आहे. तुम्हाला मते मिळत नाही, एखाद्या जातीचे, पंथाचे किंवा धर्माचे लोक तुम्हाला मतदान करत नाहीत, त्यामुळे तुम्ही व्होट जिहाद सारखे मुद्दे काढत असल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे. कोणाला मत द्यायचा हा जनतेचा प्रश्न आहे. 2014 मध्ये मुस्लिम समाजाने नरेंद्र मोदी यांना मतदान केले. मग त्याला देखील व्होट जिहाद म्हणायचे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
फडणवीसांना उपचार घेण्याची आवश्यकता
देवेंद्र फडणवीस यांना 23 तारखेनंतर मानसिक आजार जडतील, याची आम्हाला चिंता वाटते. त्यांना आता उपचाराची गरज असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
म्हणून महाराष्ट्राने तुम्हाला लोकसभेत झोपवले
महाराष्ट्रामध्ये कोणीही झोपलेले नाही. महाराष्ट्रात जागा आहे. त्यामुळेच महाराष्ट्रने तुम्हाला लोकसभा निवडणुकीत झोपवले, अशा शब्दात संजय राऊत यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. जोपर्यंत महाराष्ट्र जागा आहे, तोपर्यंत तुम्हाला महाराष्ट्र इंग्रजांप्रमाणे लुटता येणार नाही. आम्ही जागे नसतो तर अर्धा महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस आणि कंपनीने अदानीच्या नावावर करून टाकला असता, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.
ठाकरेंनी आवाज उठवला म्हणून तपासणी
उद्धव ठाकरे यांनी आवाज उठवल्यानंतरच अमित शहा आणि इतर नेत्यांच्या बॅगा चेक झाल्या असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आवाज उठल्यानंतरच निवडणूक आयोगाला जाग आली. त्यांनतरच इतरही नेत्यांच्या बॅगा चेक झाल्या. पोलिस आणि आयोग सरकारच्या सांगण्याप्रमाणेच काम करत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.
-
Horoscope Today March 13 2026 : 'या' राशींच्या आयुष्यात आर्थिक लाभ अन् खास बदल, वाचा आजचे राशीभविष्य -
29 वर्षांपूर्वीची दुखापत अन् सक्तीची विश्रांती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर शस्त्रक्रिया! -
सोनं झालं स्वस्त! युद्ध असूनही भावात मोठी घसरण का?; वाचा मुंबई, पुणे अन् नागपूरचे आजचे ताजे दर -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
पालकांकडून मिळालेल्या धड्यांनी माझ्या नेतृत्वाचा दृष्टिकोन घडवला: करण अदानी -
इराण-इस्त्रायल युद्धात उत्तर कोरियाची उडी: इराणवरील हल्ल्याचा निषेध,किम जोंग-उनांनी डागले मिसाईल! -
महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय! अदानी फाऊंडेशन भारतातील 10 लाख महिलांना देणार उद्योजकतेचे बळ -
होर्मुझची कोंडी, युएईचा 'मास्टरस्ट्रोक'; इराण-इस्रायल युद्धाच्या सावटात भारतासाठी नवे ऊर्जा द्वार! -
'धुरंधर-2' साठी प्रेक्षकांची तुफान गर्दी; रणवीर सिंहच्या स्पाय-ॲक्शन थ्रिलरचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू! -
Maharashtra weather update: एकीकडे महाराष्ट्र तापला! दुसरीकडे 'या' ठिकाणी पावसाचा इशारा -
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'ने मोडला पवन कल्याणचा रेकॉर्ड; पहिल्या दिवशी बाॅलीवूडला हादरवणारी 'एवढी' कमाई -
शिवम दुबे-अंजुम खानची 'हटके' लव्हस्टोरी; धर्माची भिंत ओलांडली! शिवमपेक्षा पत्नी वयाने 'एवढी' मोठी








Click it and Unblock the Notifications