कारखानदारांना दिल्लीत बोलवायचं, ब्लॅकमेल करायचं आणि भाजपात घ्यायच.. राऊतांनी सांगितली शहांची 'स्टाईल
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल महाराष्ट्र दौरा केला. त्यात त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांवर टिका केली. त्याच टिकेला आज शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी उत्तर दिले. अमित शहा महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्रातील नेत्यांची बदनामी करण्यासाठी येतात. जनतेचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी येतात, असा आरोप राऊत यांनी केला. भाजपच मोडस ऑपरेंडी सांगून त्यांनी थेट अमित शहांवर निशाणाच साधला.

काय म्हणाले संजय राऊत?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काल माजी कृषिमंत्री शरद पवारांवर टिका केली. त्या टिकेला आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिलं. ते म्हणाले, "अमित शाह महाराष्ट्रात येथील नेत्यांवर चिखलफेक करण्यासाठी येतात. महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी येतात. मात्र अमित शाह जन्माला आले नव्हते, तेव्हापासून महाराष्ट्राचा सहकार देशात आदर्श आहे. उलट ते सहकार मंत्री झल्यापासून राज्यातील सहकाराला घरघर लागली.
सहकाराचा गैरवापर
राऊत पुढे म्हणाले, "काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांना फोडण्यासाठी अमित शाह यांनी सहकार खात्याचा वापर केला. सहकार कारखान्याचे संचालक, संस्थापक, चेअरमन यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. मुश्रीफ, अजित पवार यांच्या कारखान्यांवर धाडी मारल्या. कारखानदारांना दिल्लीत बोलावायचं लहान सहान चुका सांगून ब्लॅकमेल करायचं आणि त्यांना भाजपात घ्यायचं... ही त्यांची मोडस ऑपरेंडी आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला.
पवारांची पाठराखण
संजय राऊत पुढे म्हणाले की, "शरद पवारांनीही कारखाने जिवंत राहावे म्हणून प्रयत्न केले. यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवार यांनी सहकार चळवळ जिवंत ठेवली. त्याऊलट अमित शाहांनी सहकार क्षेत्रातील बँका कशा लुटल्या, हे जगाला माहित आहे. विरोधी पक्षाच्या ताब्यातील कारखाने बंद करण्याचं काम त्यांनी केले. शाह हे व्यापारी आहेत. ते शेअर मार्केटमधील राजकारणी आहेत. सहकार शेयर मार्केट सारखं चालवता येत नाही," असा टोलाही त्यांनी लगावला.












Click it and Unblock the Notifications