Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भाजपला धक्का, समरजित घाटगेंचा शरद पवार गटात प्रवेश

कोल्हापूर : समरजित घाटगे यांना केवळ महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पाठवायचे नाही. तर त्यांना विधानसभेत मोठी जबाबदारी देखील दिली जाईल, अशी घोषणा शरद पवार यांनी केली. कागलमध्ये समरजित घाटगे यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी व्यासपिठावरून शरद पवार बोलत होते.

पवार पुढे बोलताना म्हणाले की, राज्यातील सरकार बदलल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. समरजित यांनी घेतलेला निर्णय सार्थकी लागेल. ज्या लोकांनी गद्दारी केली त्यांना सोडणार नाही, त्यांना त्यांची जागा दाखवणारच, असा इशारा त्यांनी नाव न घेता मंत्री हसन मुश्रीफ यांना दिला.

कागलमध्ये घाटगे विरुद्ध मुश्रीफ लढत होणार

भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी आज कागलमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश जाहीर प्रवेश केला आहे. घाटगे यांच्या पक्ष प्रवेशाप्रसंगी शरद पवार यांची विशेष उपस्थितीत होती. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाव न घेता अजित पवारांचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. तर समरजितसिंह घाटगे यांच्या उमेदवारीची देखील घोषणा केली. त्यामुळे कागल मतदारसंघात अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यात थेट लढत विधानसभेत होणार आहे.

Samarjeetsinh Ghatge

जयंत पाटलांचा मुश्रीफांवर हल्लाबोल

कागलमधील काही लोक धर्मांध सत्तेच्या बाजूला जाऊन बसली आहेत. पण समतेचा संदेश आपल्याला विसरून चालणार नाही. त्यामुळे कागलचा पुढील आमदार हे समरजित घाटगेच असले पाहिजे, असे आवाहन जयंत पाटील यांनी उपस्थितांना केली. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा भ्रष्टाचारी सरकारच्या मुळे कोसळला. कारण त्यांनी योग्य व्यक्तीला त्याचे नाव दिले नव्हते. कामाची काळजी घेतली गेली नाही. हे महायुती सरकार भ्रष्टाचारी आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. सगळ्या कामात भ्रष्टाचार सुरू केलेला आहे.

जयंत पाटील म्हणाले की, तुमच्याकडे एक यात्रा येईल, तुम्हाला सांगितले जाईल की आम्हालाच निवडून द्या, नाहीतर महाविकास आघाडीवाले सर्व योजना बंद पाडतील, पण मी तुम्हाला सांगतो की, कुणतीही योजना बंद होणार नाही. वेळप्रसंगी त्या योजना अधिक चांगल्या पद्धतीने आम्ही चालवू, त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवू नका. आम्ही तुमच्यासाठी कायम राहू. घाटगे यांना सांगू शकतो की, हा पक्ष जिव्हाळ्याचा आहे. आपल्या माणसांचा पक्ष आहे. कधीही पवार साहेबांनी चुकीच्या गोष्टी करायला लावल्या नाहीत. तुमच्यासारखा युवा नेता पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करेल, असा विश्वास मला आहे.

नेत्यांना सांगून निर्णय घेण्यासाठी धमक लागते

समरजितसिंह घाटगे म्हणाले, हा निर्णय घेत असताना माझ्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो. नेत्यांना सांगून करण्यासाठी धमक लागते. प्रेम केलं तर तन-मन-धन करून करायचं. इथून पुढे तुम्हाला त्रास होणार, सरकारी ताकद लावली जाईल, पण हा समरजित तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. तसेच सरकारी ताकद फक्त दोन महिनेच राहणार असल्याचे सांगत त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 2019 मध्ये तयारी नव्हती, पण तरी आपण लढलो.

आता विषय माझा नाही तर कागलचा आहे. माझ्या आणि शरद पवारांच्या भेटी देखील झाल्या होत्या, त्यावेळी मला विचार करण्यासही सांगितले होते. तेव्हा मी कागलच्या जनतेला विचारल्याशिवाय निर्णय घेणार नाही, असा निरोप त्यांना दिला होता. अखेर मी त्यासंदर्भातला निर्णय घेतला.

कागलचा गैबी चौक ऐतिहासिक

कागल शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. देशाला सामाजिक समतेचा संदेश देणारे शाहू महाराज यांचे मूळ गाव कागल. त्यामुळे शरद पवारांचे या मतदारसंघावर पहिल्यापासून विशेष प्रेम व लक्ष आहे. या मतदारसंघातून एकेकाळी शरद पवारांचे शिष्य समजल्या जाणारे हसन मुश्रीफ हे पाच वेळा निवडून आले आहेत. बदललेल्या राजकीय परिस्थितीत मुश्रीफांनी अजितदादांची साथ दिली. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कागलची जागा राखायचीच या इर्षेने शरद पवारांनी थेट समरजीत घाटगेंना पक्षात घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

विधानसभेची शेवटची सभाही गैबी चौकातच

समरजीत घाटगेंच्या पक्षप्रवेशाची सभा ज्या गैबी चौकात झाली त्याच चौकात विधानसभेची शेवटची सभा घेतली जाईल असं समरजीत घाटगेंनी सांगितलं.यंदा विधानसभा निवडणुकीतील शेवटची सभा गैबी चौकातच होणार. या सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच उपस्थिती रहावे. कारण मागच्या वेळी याच गैबी चौकातून त्यांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला. यंदा याच चौकातून आपण विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे. त्यामुळे गैबी चौकात सभा घ्यावीच लागेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+