'सपा'ने महाराष्ट्रात फुकले विधानसभेच्या निवडणुकीचे रणशिंग
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. जागा वाटपावरून देखील चर्चा सुरू आहे. समाजवादी पार्टीच्या वतीने देखील बैठका सुरू झाल्या आहेत.त्यामध्ये,महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी आम्हाला सन्मान जनक जागा देईल अशी अपेक्षा आहे असं सांगत समाजवादी पक्षाने विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे.

समाजवादी पक्षाच्या नवनियुक्त खासदारांचा सन्मान करण्यासाठी मुंबई येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातूनच आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ देखील फोडण्यात आला.समाजवादी पक्षाच्या खासदारांनी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरांनी मनीभवन गांधी संग्रहालयाला देखील भेट दिली.
महाविकास आघाडी कडून आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय
भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी महाविकास आघाडी कडून समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचा आरोप देखील केला. महाराष्ट्रामध्ये विरोधकांची महाविकास आघाडी ज्यामध्ये ठाकरे गट,काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांचा समावेश आहे. राष्ट्रीय पातळीवर हे इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत. इंडिया आघाडीत समाजवादी पक्षाची भागीदारी मोठी आहे. जर अखिलेश यादव यांनी काही सांगितले तर त्याला इंडिया आघाडीतील कोणीही नकार देणार नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काच्या जागा मिळायला हव्यात, सन्मान जनक जागा वाटप हवे असेही यावेळी बोलताना आमदार रईस शेख यांनी म्हटलं
आमच्या पाठिंब्याशिवाय इंडिया आघाडीचे सरकार बनू शकत नाही
सध्या आमचे दोन आमदार आहेत परंतु आम्ही शंभर आमदारांना भारी पडू. आमचे दहा आमदार निवडून येऊ शकतात असंही आमदार रईस शेख यांनी सांगितले. समाजवादी पक्षाने महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा लढवल्या नाहीत. उत्तर प्रदेश मध्ये आम्ही 37 जागांवर विजय मिळवत सत्ताधारी भाजपला झटका दिला. महाराष्ट्रात समाजवादी पक्षाचे दोन आमदार आहेत ते मुस्लिम समुदायातून येतात. समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याशिवाय केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार बनू शकत नाही, असे देखील समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांनी म्हटले.
अबू आझमींची नाव न घेता राज ठाकरेंवर टीका..
मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर भागात प्रतिनिधित्व करणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमीनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात पक्षाचे मनोबल वाढले आहे. उत्तर भारतीयांना कोणीही आव्हान देऊ नये, अन्यथा आम्ही जशास तसे उत्तर देऊ. मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही. त्यांनी किती गाड्या फोडल्या, दुकाने तोडली. मला एकदा गृहमंत्री बनू द्या, मग या लोकांना असं सांभाळेल की, ते कधीही विसरू शकणार नाहीत असं सांगत आझमींनी नाव न घेता राज ठाकरेंवर निशाणा साधला.












Click it and Unblock the Notifications