Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

RSS Shatabdi Mahotsav 2025: दसरा मेळाव्यात मोहन भागवतांचा कडक प्रहार! वाचा 5 मुद्द्यात तडाखेबंद भाषण

RSS Shatabdi Mahotsav 2025 Mohan Bhagwat Speech : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित दसरा मेळाव्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राष्ट्र आणि जागतिक स्तरावरील प्रमुख मुद्द्यांवर अत्यंत महत्त्वपूर्ण भाष्य केले. सुरक्षा, राष्ट्रीय एकता, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण या चार स्तंभांवर लक्ष केंद्रित करत त्यांनी देशाला आणि स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. खासकरून, सीमेपलीकडील दहशतवाद आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल यावर भाष्य करताना, त्यांनी स्वावलंबन आणि नैतिक नेतृत्व यावर जोर दिला.

RSS Shatabdi Mahotsav 2025

सरसंघचालकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या समर्पण आणि चारित्र्याचा गौरव करत, राष्ट्रासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या विभूतींचे स्मरण यावेळी केले. त्यांनी दहशतवाद, स्वदेशी, पहलगाम हल्ला आणि नैसर्गिक आपत्ती यावर भाष्य केले, त्यांच्या भाषणातील प्रमुख पाच मुद्दे जाणून घेऊया.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातील 5 प्रमुख मुद्दे

1 . दहशतवादाला चोख उत्तर आणि राष्ट्रीय एकता

पहलगाम येथे सीमेपलीकडील दहशतवाद्यांनी धर्म विचारून 26 भारतीय नागरिकांची हत्या केल्याच्या घटनेवर त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारची दृढता, सशस्त्र दलांचे शौर्य आणि समाजातील एकता यातून देशात एक आदर्श वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे खरे मित्र कोण आहेत आणि कोण नाही, हे स्पष्ट झाले, असे त्यांनी नमूद केले.

2. संविधानविरोधी घटकांवर चिंता

दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर देशात काही असंविधानिक आणि संविधानविरोधी विचारधारेचे घटक कार्यरत आहेत. त्यांच्या कृती आणि विचारधारेमुळे समाधानाचे वातावरण दूर होत आहे. देशाच्या स्थैर्याला आव्हान देणाऱ्या या शक्तींना ओळखणे आणि त्यांचा सामना करणे आवश्यक आहे.

3. जागतिक व्यापार आणि स्वावलंबनाची गरज

अमेरिकेच्या नवीन टॅरिफ धोरणांचा उल्लेख करत त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांबद्दल भाष्य केले. कोणताही देश एकाकी राहू शकत नाही आणि जग परस्पर निर्भरतेवर चालते हे स्पष्ट केले. मात्र, हे अवलंबित्व सक्तीमध्ये बदलू नये यासाठी भारताने 'स्वदेशी' आणि 'स्वावलंबनावर' लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय संबंध सक्तीशिवाय राखण्याचा सल्ला त्यांनी दिला.

5. हिंसक आंदोलनावर भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभात सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, "जेव्हा सरकार लोकांपासून दूर राहते आणि त्यांच्या समस्यांबद्दल त्यांना माहिती नसते आणि त्यांच्या हितासाठी धोरणे आखली जात नाहीत, तेव्हा लोक सरकारच्या विरोधात जातात. परंतु आपला नाराजी व्यक्त करण्यासाठी या मार्गाचा वापर केल्याने कोणालाही फायदा होत नाही. जर आपण आतापर्यंतच्या सर्व राजकीय क्रांतींचा इतिहास पाहिला तर त्यापैकी कोणीही त्यांचे उद्दिष्ट साध्य केलेले नाही. सरकार असलेल्या राष्ट्रांमधील सर्व क्रांतींनी आघाडीच्या राष्ट्रांना भांडवलशाही राष्ट्रांमध्ये रूपांतरित केले आहे. हिंसक निषेधांमध्ये कोणतेही ध्येय साध्य होत नाही, परंतु देशाबाहेर बसलेल्या शक्तींना त्यांचे खेळ खेळण्यासाठी व्यासपीठ मिळते."

5. पर्यावरणाचा गंभीर धोका - हिमालयाची स्थिती

गेल्या ३-४ वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती वाढल्या असून भूस्खलन आणि सतत पाऊस पडणे सामान्य झाले आहे. हिमालय, जी आपली सुरक्षा भिंत आणि पाण्याचा स्रोत आहे, तिची सध्याची परिस्थिती धोक्याची घंटा वाजवत आहे. सध्याच्या विकासाच्या पद्धतींमुळे आपत्ती वाढत असतील, तर धोरणांवर पुनर्विचार करणे आवश्यक आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+