Rohit Arya एन्काऊंटर झालेल्या रोहित आर्याचा 'तो' शेवटचा VIDEO, मुलांना का ठेवलं ओलीस? सर्वच सांगितलं

Rohit Arya Encounter last video : मुंबईतील पवई येथील आर. ए. स्टुडिओमध्ये १७ शाळकरी मुलांना ओलीस ठेवून संपूर्ण शहरात खळबळ माजवणारा आरोपी रोहित आर्या याला पोलिसांनी एका नाट्यमय कारवाईत एन्काऊंटरमध्ये कंठस्नान घातले. ओलीस मुलांचा जीव वाचवण्यासाठी मुंबई पोलिसांनी तातडीने ही कारवाई केली, ज्यात रोहित आर्या एअर गन आणि आगीची धमकी देत होता. या थरारनाट्याचा शेवट मुलांच्या सुखरूप सुटकेने झाला; मात्र आरोपीच्या मागण्या आणि राज्य शासनाशी त्याचा असलेला आर्थिक वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

रोहीत आर्याच्या एन्काऊंटरनंतर विरोधी पक्षाने टीका केली असून ओलीस नाट्यापुर्वी रोहीत आर्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्याने अनेक गोष्टींचा उलगडा केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Rohi Arya Encounter last video


रोहित आर्याचा शेवटचा व्हिडिओ संदेशातील मुख्य मजकूर मागण्या आणि धमकी

मला चर्चा हवीय..

रोहीत आर्या आपल्या व्हिडिओत सांगतो की, "मी सुसाईड करणार होतो पण नंतर मी प्लॅन बदलला. माझ्या फारशा मागण्या नाहीत, फक्त साध्या मागण्या आहेत. मला काही लोकांशी बोलायचे आहे आणि काही प्रश्न विचारायचे आहेत, पण मला ही उत्तरे हवी आहेत. मला दुसरे काहीही नको आहे. मी दहशतवादी नाही, किंवा मी पैसे मागत नाही. मला फक्त एक साधी चर्चा हवी आहे, म्हणूनच मी मुलांना ओलीस ठेवले आहे."

Take a Poll

धमकी आणि इशारा

रोहीत आर्या त्याच्या व्हिडिओत धमकीवजा इशारा देतो, तो सांगतो की, "तुमच्या एका चुकीच्या हालचालीमुळे मी संपूर्ण जागेला आग लावू शकतो आणि त्यातच मीपण मरेन. मी मेलो की नाही याने काही फरक पडत नाही. पण, मुलांना दुखापत होईल. जर त्यांचे काही वाईट घडले तर, यासाठी मला जबाबदार धरले जाऊ नये, तर जे सामान्य माणूस फक्त बोलू इच्छित असताना हे सर्व अनावश्यकपणे भडकवत आहेत, त्यांना जबाबदार धरले पाहिजे. माझे बोलणे संपल्यानंतर मी स्वतःहून बाहेर येईन."

... अन् रोहीत आर्याचा एनकाऊंटर

या व्हिडिओद्वारे, रोहित आर्याने आपण दहशतवादी नसल्याचे आणि पैशांची मागणी नसल्याचे स्पष्ट केले होते. शासनाकडून थकीत असलेले पैसे आणि प्रकल्पांवर चर्चा करण्याची त्याची मुख्य मागणी होती. कोणत्याही चुकीच्या हालचालीवर गंभीर परिणाम होतील, असा त्याने इशारा दिला होता. त्यानंतर त्याने मुलांना ओलीस ठेवले, यानंतर पोलिस कारवाई झाली आणि रोहीत आर्या याचा एनकाऊंटर करण्यात आला.

रोहीत आर्याने मुलांना का ठेवले होते ओलीस?

उपलब्ध माहितीनुसार, रोहित आर्याने मुलांना ओलीस ठेवण्याचे कारण 'शासनाकडून प्रकल्पाचे दोन कोटी रुपये थकले' असल्याचा आरोप होता, ज्याबद्दल त्याला चर्चा करायची होती. मात्र, नंतर पोलीस कारवाईत त्याचा मृत्यू झाला आणि सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

शेवटचा व्हिडिओ आणि रोहितच्या मुख्य मागण्या

मुलांना ओलीस ठेवल्यानंतर रोहित आर्याने एक व्हिडिओ जारी केला होता, ज्यामध्ये त्याने प्रशासनासमोर आपल्या मागण्या मांडल्या. त्याला दहशतवादी न मानता, त्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आणि मागण्यांवर संबंधित लोकांशी साधी चर्चा करायची होती. त्याची कोणतीही मोठी पैशांची मागणी नव्हती.

काय होता आरोप रोहीत आर्याचा आरोप?

रोहीत आर्याने शासनाकडून थकीत असलेल्या रकमेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याने स्पष्टपणे सांगितले की, तो आत्मसमर्पण करेल, परंतु तोपर्यंत त्याच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. रोहित आर्याच्या कृत्यामागे त्याचा राज्य शासनासोबतचा आर्थिक वाद हे प्रमुख कारण होते. रोहित आर्याचा दावा होता की, राज्यातील शाळांमध्ये राबवलेल्या 'स्वच्छता मॉनिटर अभियान' आणि इतर प्रकल्पासाठी लागलेला खर्च शासनाने थकवला आहे.

शासनाने रोहीतने सुमारे दोन कोटी रुपयांची रक्कम थकल्याचा आरोप केला होता. यापूर्वीही त्याने या रकमेसाठी तत्कालीन शिक्षणमंत्री (दीपक केसरकर) यांच्या काळात उपोषण केले होते आणि निकालावर आक्षेप घेतला होता.

सरकारची बाजू काय?

सरकारने रोहित आर्याच्या आरोपांवर थेट आणि तात्काळ प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, पोलिसांनी १७ लहान मुलांचा जीव धोक्यात आल्याने आणि आरोपीकडून थेट हिंसेचा धोका असल्याने कठोर कारवाईचे समर्थन केले आहे. पोलिसांचे प्राधान्य मुलांच्या सुरक्षिततेसाठी होते. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी "मी शिक्षणमंत्री असताना स्वतः रोहित आर्य यांना मदत केली होती. मी चेकने त्यांना स्वत: पैसे दिले आहेत. पण, सरकारच्या पेमेंटसाठी सर्व औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे त्यांचा जो दावा होता की, 2 कोटी मला येणे आहे हा मला तरी योग्य वाटत नाही. त्यांनी डिपार्टमेंटशी खात्री करायला हवी होती." असे वक्तव्य केले आहे

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+