Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'या' जिल्ह्यात 24 तासात विक्रमी पाऊस, 2 गावांचा संपर्क तुटला! गोसीखुर्द, वैनगंगेचे एकूण 56 दार उघडले

Record rainfall : भंडारा जिल्ह्यात मागील 24 तासापासून पावसाची संततधार सुरू आहे, अनेक नदी- नाल्यांवरून पाणी वाहत आहे. तुमसर तालुक्यातील सीलेगाव - वाहनी येथील नाल्यावर दोन फूट पाणी असल्यामुळे दोन्ही गावांचा ये जा करण्याच्या संपर्क तुटला तर बावनथडी नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे 33 तर गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा नदीवर बनविण्यात आलेल्या धापेवाडा बॅरेजचे संपुर्ण 23 दरवाजे उघडण्यात आले आहेत, नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Record rainfall in Bhandara Gondia

गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले

भंडारा जिल्ह्यात मागील 24 तासापासून पावसाची संततदार सुरू आहे तर या पावसामुळे गोसीखुर्द धरणाचे 33 ही दरवाजे खुले करण्यात आले असून वैनगंगा नदीची धोका पातळी 245.50 मीटर इतकी आहे. तर आता वैनगंगा नदीच्या पाणी पातळी 244.94 इतकी वाढ झालेली असून वैनगंगा नदी लवकरच आपली इसारा पातळी ओलांडणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे. तर जिल्ह्यातील छोटे नाले हे ओसंडून वाहत असून त्या नाल्यावरून गावकऱ्यांनी ये-जा करू नये असा इसारा सुद्धा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे.

बावनथडी नदीवरील बपेरा पूल वाहतुकीसाठी बंद

भंडारा जिल्ह्यात मागील 24 तासापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, ओसंडून वाहन आहेत. तर ग्रामीण भागातील छोटे नाले हे दुतळी भरून वाहत असून अनेक नाल्यांवरून पाणी वाहत आहे. तुमसर तालुक्यातील सीलेगाव - वाहनी येथील नाल्यावर दोन फूट पाणी असल्यामुळे दोन्ही गावांचा ये जा करण्याच्या संपर्क तुटलेला आहे. तर बावनथडी नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या पुलावर पाणी असताना नागरिकांनी पुलावरून जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तर अनेक शेतकऱ्यांची शेती सुद्धा पाण्याखाली गेली असून या पावसाचा फटका शेतकऱ्यांना सुद्धा बसलेला आहे.

वैनगंगेचे 23 दरवाजे उघडले

गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे संपुर्ण 23 दरवाजे उघडलेण्यातआले आहे. या 23 दरवाज्यांमधून 1 लक्ष 83 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सध्या सुरु आहे. गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असुन या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. नदीची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी वैनगंगा नदीवर बनविण्यात आलेल्या धापेवाडा बॅरेजचे संपुर्ण 23 दरवाजे उघडण्यात आले. दरम्यान, नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बीडच्या गेवराई तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील वडगाव सुशी येथे सोमवारी 7 जुलै रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घराची पडझड होऊन शेतातील काही झाडे उन्मळून पडली आहेत. तर वादळी वाऱ्याचा जोर इतका प्रचंड होता की घरावरील तसेच जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे देखील अर्धा किलोमीटर पर्यंत उडून गेली आहेत. तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतात बसवलेली सौर पंपाचे देखील वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर जीवीत हानी टळली पण घरांसह सौर पंपाचे मोठे नुकसान झाले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+