Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपदापासून डावलले; पण भाजप प्रदेशाध्यपदाचा मिळू शकतो मान?

महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारमध्ये डोंबिवलीचे आमदार आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची वर्णी लागेल अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, ऐनवेळी त्यांना मंत्रिपदापासून डावलण्यात आले आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांचे पुढील राजकीय करिअर कसे असणार अशी चर्चा रंगली आहे. अशातच त्यांच्यावर भाजप प्रदेशाध्यपदाची जबाबदारी मिळू शकते, असा अंदाज देखील राजकीय वर्तुळात वर्तविला जात आहे.

ठाकरे गटाच्या उमेदवाराचा केला पराभव

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चव्हाण यांनी उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांचा तब्बल 77 हजार मतांनी पराभव केला होता. रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. एक आक्रमक लोकप्रतिनिधी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. संघटन कौशल्याबद्दल देखील त्यांची ख्याती आहे.

Ravindra Chavan Age Biography

डोंबिवली शहरातून रवींद्र चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. 2005 साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर ते नगरसेवक म्हणून निवडून गेले. स्थायी समिती सदस्य, स्थायी समिती अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. 2009, 2014 आणि 2019 अशा सलग तीन विधानसभा निवडणुका त्यांनी डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून जिंकल्या. देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात यांची वर्णी लागली होती. पहिल्या मंत्रीपदाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी दिली होती. त्या माध्यमातून चव्हाण यांनी कोकणात संघटन प्रचंड वाढवले.

2019 साली चव्हाण डोंबिवलीतून पुन्हा निवडून आले. पण दुर्दैवाने भाजपचे सरकार आले नाही. 2022 साली एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले त्यावेळी शिंदे यांच्या गटाला सगळी रसद पुरवण्याची जबाबदारी चव्हाण यांनी सांभाळली. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाकडे त्यांनी जातीनिशी लक्ष दिले आणि या कामाला गती दिली. चौपदरीकरणात अडथळे आणणाऱ्या अनेक घटकांना त्यांनी दमात घेतले. लोकसभा निवडणुकीत पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग ची जबाबदारी चव्हाण यांच्यावर देण्यात आली होती ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. विधानसभा निवडणुकीत देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात युतीच्या तीन पैकी तीन जागा निवडून आणण्यात रवींद्र चव्हाण यांनी मोलाची भूमिका बजावली.

आक्रमक व प्रशासनावर पकड असलेला नेता अशी ओळख

आक्रमक आणि प्रशासनावर पकड असलेला नेता म्हणून रवींद्र चव्हाण यांची ओळख आहे. स्पष्ट वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. कार्यकर्त्यांना ताकद देणार ही त्यांची खासियत आहे. त्यामुळे त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांचे मोहोळ सातत्याने दिसते. डोंबिवली कार्यक्षेत्र असले तरी पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी संघटना बांधणी उत्तम रीतीने केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी चव्हाण जीवाचे रान करतात, असा भाजपच्या कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. डोंबिवली येथील साहित्य, सांस्कृतिक आणि क्रीडा विषयक उपक्रमांना चव्हाण यांचे चांगले पाठबळ आहे. विशेषतः शहरातील हिंदुत्ववादी उपक्रमांना ते अधिक मदत करतात. विधानसभा निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले दीपेश म्हात्रे हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. उद्धव ठाकरे यांचे समर्थक असलेल्या म्हात्रे यांनी काही काळ एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले. पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या गटात दाखल झाले होते.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+