संभाजी भिडे प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची माणसं आहेत का ? शरद पवार संतापले
पुणे : आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राज्याचं राजकारणं आता चांगलचं तापलं आहे. मग आरक्षणाच्या मुद्दा असो की अजून काही मात्र सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता आरोप-प्रत्योराप सुरुच आहेत. या पार्श्वभूमीवर शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी काल मराठा आरक्षणावरुन आपली भूमिका मांडली होती. संभाजी भिडे म्हणाले होते की, "मराठ्यांना देश चालवायचा आहे, आरक्षण कसलं मागता," असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यावर शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी संताप व्यक्त करत बोलणं टाळलं आहे.
"संभाजी भिडे यांच्यावर वक्तव्य प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची ती माणसं आहे का, असा सवाल शरद पवार यांनी केला. पुण्यातील मोदीबाग येथे शरद पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. त्यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. अजित पवारांच्या बारामतीतील लढण्याच्या विषयावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. "सार्वजनिक जीवनात काम करत असताना त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे," असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

जम्मू काश्मीर आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका बद्दल शरद पवार म्हणाले की, "जम्मू कश्मीरसोडून झारखंड आणि हरियाणा इथं आमचे उमेदवार असणार आहेत. तिथं आम्ही निवडणूक लढवणार आहोत." लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत शरद पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, मला त्याबाबत माहीत नाही.
15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात वन नेशन वन इलेक्शनचा आग्रह त्यांनी धरला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तीन राज्यांची निवडणूक जाहीर झाली. मात्र यात महाराष्ट्राचा समावेश नाही. याचाच अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलतात एक आणि करतात एक, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.












Click it and Unblock the Notifications