Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुणेकरांनो काळजी घ्यावी, खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढणार

Pune Rain Update : मागील काही दिवसांपासून धरणक्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं पुणे जिल्हातील धरणं पूर्ण भरले आहेत. आज सकाळी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. खडकवासला धरणातून आज सकाळी 11 वाजता पुन्हा 35 हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे. तरी प्रशासनाच्यावतीने एकता नगर व मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि आपले वाहने सुरक्षित स्थळी लावावेत अश्या सुचना करण्यात आला आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली आहे. या लष्कराच्या काही तुकड्या दाखल करण्यात आल्या आहेत. तर पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. एकता नगर परिसरात पाणी घुसायला सुरुवात झाली आहे. तरी परिसरातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा अश्या सुचना करण्यात आल्या आहेत.

khadakwasla dam

भारतीय हवामान विभागाने पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. कोयना धरणक्षेत्रात तसेच पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

खडकवासला धरणातून सध्या 27 हजार 16 क्युसेक्स, मुळशीतून 27 हजार 609 क्युसेक्स, पवनातून 5 हजार क्युसेक्स, चासकमान धरणातून 8 हजार 50 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरु आहे. धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरु राहिल्यास विसर्गाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पुररेषेलगतच्या तसचे सखल भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, त्यासाठी स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षित निवा-यांची सोय करावी. तसेच त्यांना संपूर्ण मदत व सहकार्य करावे असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. कोयना धरणातून ही 5 हजार क्यूसेक्स वेगाने विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णकाठच्या गावांना आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+