Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुलींची अंतर्वस्त्र तपासल्याचं नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या, प्रकाश आंबेडकर काय म्हणाले- बघा VIDEO

Pune Crime News What is 3 women allege harassment case : पुणे शहरातल्या कोथरूड परिसरात छत्रपती संभाजीनगरमधील एका प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी तीन मुलींसोबत पोलिसांनी जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि लैंगिक छळ केल्याचा मोठा आरोप करण्यात आला आहे. यानंतर आता वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन केले जात असून पोलिसांनी घरात घुसून बाथरुम आणि बेडरूममध्येही तपासणी केली. इतकेच नव्हे, तर त्यांच्या इनरवेअरचीही तपासणी केल्याचा गंभीर आरोप तरुणीने केला आहे.

या प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली असून कदम नावाच्या पोलिस अधिकाऱ्यांसोबत त्यांचा संवादाचा व्हिडिओही त्यांनी पोस्ट केला आहे. मुलगी २५ वर्षांची आहे, हे सगळे कुणाच्या तरी घरात घुसतात. कोणत्या कायद्याखाली ते घुसतात, पोलिसांना लायसन्स तर दिलेले नाही ना..असा सवाल कदम या अधिकाऱ्यांना सवाल केला.

Pune Crime News

Take a Poll

प्रकाश आंबेडकरांचा अधिकाऱ्यांशी काय झाला फोनवर संवाद..?

यावेळी फोनवर प्रकाश आंबेडकर संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना म्हणाले, एफआयआर नोंदवायला हवा, चौकशी तर होत राहील. दोन दिवस कशाला तत्काळ एफआयआर व्हायला हवा. नाहीतर मी त्यांना सांगेल की धरणे देऊन बसेल. तुम्ही विनंती करु नका..कायदा कायदा आहे, गुन्हा नोंदवून घ्या, चौकशी होत राहील. तुमच्या चौकशीवरुन जो निष्कर्ष येईल त्यावरच तुम्ही कारवाई कराल ना..एफआयआर नोंदवायला सांगा.

अधिकारी एक-दोन दिवसांत एफआयआर दाखल करुन घेऊ, असे सांगत होता. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, एक लक्षात घ्या कदम.... ती मुलगी 25 वर्षांची आहे. कुठलातरी पोलीस औरंगाबादमधून येतो आणि हे सगळ्या कोणाच्यातरी घरात घुसतात. हे पोलीस कोणत्या कायद्याखाली मुलींच्या घरात घुसतात?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारला.

प्रकाश आंबेडकरांनी दिली प्रकरणाची माहिती

सोशल मीडियावर पोस्ट करुन प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आणि पोलिसांना आंदोलनाचा इशाराही दिला आहे. छत्रपती संभाजीनगर ते पुणे अशी किनार असलेल्या या प्रकरणाबद्दल प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की, "औरंगाबादमधील एक विवाहित महिला पतीच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. तिला मदत करण्यासाठी पुण्यातील तीन सामाजिक कार्यकर्त्या महिला पुढे आल्या. त्यांनी तिला 'वन स्टॉप सखी सेंटर'मध्ये दाखल केलं आणि तिला स्वावलंबी होण्यासाठी मदत केली."

'त्या' महिलेचा नातेवाईक निवृत्त पोलिस अधिकारी

प्रकाश आंबेडकरांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे हेही म्हटलं की, "या महिलेच्या नातेवाईकांपैकी एक व्यक्ती औरंगाबादमध्ये निवृत्त पोलिस अधिकारी असल्याचे सांगितले जाते. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पुणे पोलिसांची मदत घेतली, असा आरोप आहे. यानंतर कोथरूड पोलिसांनी कोणत्याही वॉरंटशिवाय या तीन महिलांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात नेलं."

जातीय अन् स्त्रीद्वेषी शिविगाळ..!

प्रकाश आंबेडकरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "पुणे पोलिस त्या आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत, ज्यांनी मध्यरात्री तीन महिला तक्रारदाराच्या घरात घुसून त्यांना जातीय आणि स्त्रीद्वेषी शिवीगाळ केली. मी पुणे शहराच्या पोलीस उपायुक्तांशी संपर्क साधून त्यांना तात्काळ एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले. मी त्यांना स्पष्ट सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की पोलिसांना मिळालेल्या माहितीत जर कुठल्याही संज्ञेय गुन्ह्याचा उल्लेख होत असेल, तर एफआयआर नोंदवणे बंधनकारक आहे. मी ठामपणे सांगितले, कायदा म्हणजे कायदाच असतो!"

'वंचित'कडून आंदोलन

वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा समित्यांनी एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांविरोधात आंदोलन केले होते. जर पोलिसांनी यानंतरही एफआयआर दाखल केला नाही, तर आम्ही मोठ्या संख्येने एसपी कार्यालयासमोर एकत्र येऊन तीव्र आंदोलन करू, असा इशारा वंचिततर्फे देण्यात आला आहे.

पोलिसांना एवढी भीती कशाची?

यावेळी पुणे पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अजूनही अट्रोसिटी कायद्याचे महत्त्व, पीडित महिलांचा त्रास समजत नाहीये. गेल्या 15 तासांपासून पीडित तरुणी पोलीस आयुक्तालयात एफआयआर नोंदवावी म्हणून लढताय. तरीसुद्धा पोलिस प्रशासन गुन्हा नोंदवायला तयार नाही. पोलिसांना एवढी भीती कशाची? पोलिस आरोपींना पाठीशी का घालताय? सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतांना पुणे पोलीस आरोपींना पाठीशी का घालताय? आंदोलनकर्त्यांनी प्रश्न विचारल्यावर पळ काढणे, हे पुणे पोलिसांचे अपयश आहे! जोपर्यंत पोलिसांवर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते पोलिस आयुक्तालय सोडणार नाही, असेही प्रकाश आंबेडकरांनी एक्सवरील पोस्टद्वारे इशारा दिला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+