महायुतीच्या नको त्या उद्योगांमुळे नागपूरला येणारा 18 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला!- वडेट्टीवार
Maharashtra Politics :नागपूरमध्ये देशातील सर्वात मोठ्या रिन्यूएबल अँड ग्रीन एनर्जी कंपनीचा सोलर पॅनल प्रकल्प येणार होता. मात्र हा प्रकल्प आता गुजरातला गेला आहे. या प्रकल्पा अंतर्गत 18 हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. राजकीय उदासीनता आणि अधिकाऱ्यांचे प्रयत्न अपुरे पडल्याने हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचे बोलले जात आहे मात्र महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे राज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे गेल्या असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
या प्रकल्पात 18 हजार कोटी रुपये गुंतवणुक केली जाणार होती, अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रात 300 एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. यातून 3 हजार युवकांना रोजगार देण्याची कंपनीची योजना होती. पण हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्यामुळे आता स्थानिक युवकांना रोजगारासाठी दुसऱ्या प्रकल्पाची वाट पाहावी लागणार आहे.

विजय वडेट्टीवार यांचे खोचक ट्विट
विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे राज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे! असे ट्विट केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्प येणार होता. या प्रकल्पा अंतर्गत 18 हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची माहिती पुढे आली आहे.
महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे राज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे!
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 19, 2024
महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्प येणार होता. या प्रकल्पा अंतर्गत 18 हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हे प्रकल्प…
वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प, टाटा-एअरबस विमान प्रकल्प आणि आता सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. हिंदू - मुस्लिम, जीभ कापा- जीभेला चटके द्या, पक्ष फोडा- आमदार पळवा... सतत असे निरर्थक उद्योग करणारे महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे. अधिकारी मंत्र्यांना खुश करण्यात व्यस्त आहे. मंत्र्यांची मस्ती, आमदारांचे नको ते लाड यामुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे आणि राज्यातील तरुणांचे रोजगार हिरावले जात आहेत. असेही वडेट्टीवार यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
वेदांता फाॅक्सकाॅन वरुन तापले होते राजकीय वातावरण
वेदांता आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्ट हा महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलच तापलं होते.. महाराष्ट्रात मंजूर झालेला हा प्रकल्प गुजरातला( का गेला? प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी शिंदे सरकारला धारेवर धरले होते. आता पर्यंत 4 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प राज्याबाहेर गेले असल्याचे बोलले जात आहे.












Click it and Unblock the Notifications