Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडताय ? शरद पवार, उध्दव ठाकरे, फडणवीसांच्या गाड्या फोडा- प्रकाश आंबेडकर

परभणी : अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर दोन दिवसापुर्वी मनसे कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला होता तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. जितेंद्र आव्हाड हे घरी जाताना त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली.या दोन्ही आमदारांवर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. त्यातच आता वंचित बहुनज विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडताय? गाड्या फोड्याच्याच असतील तर मी चार लोकांचे नाव सांगतो त्यांच्या गाड्या फोडा, यामध्ये शरद पवार ,देवेंद्र फडवणीस,उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. आंबेडकर परभणीतील गंगाखेड येथे बोलत होते. प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने परभणीत त्यांची सभा झाली.आरक्षण बचाव यात्रेच्या आयोजित जाहीर सभेत त्यांनी अशा प्रकारचं विधान केले आहे.

Prakash Ambedkar

जितेंद्र आव्हाड हे शरद पवार गटाचे आणि अमोल मिटकरी हे अजित पवार गटाचे आहेत. या गाड्या फोडणाऱ्यांना माझे आवाहन आहे, अशा चिल्लर लोकांच्या काय फोडताय? यांच्या गाड्या फोडून काहीच होणार नाही. तुम्हाला गाड्या फोडायच्याच असेल तर चार माणसांची नावे मी तुम्हाला देतो, त्यांच्या गाड्या फोडा.यामध्ये शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे. अजित पवार यांच्या गाड्या फोडा, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर झाला होता हल्ला

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गटनेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर गुरुवारी 3 ते 4 जणांनी हल्ला केला. हल्ल्यात त्यांच्या मोटरगाडीची काच फुटली होती. स्वराज पक्षाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींवरील वक्तव्यामुळे हा हल्ला करण्यात आल्याचे स्वराज पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी आता अंकुश कदम आणि धनंजय जाधव या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला

आव्हाड मुंबईहून ठाण्याला जात असताना 3 ते 4 जणांनी त्यांच्या गाडीवर काठ्या व दगड फेकले. त्यांनी आव्हाडांची गाडीही अडवण्याचा प्रयत्न केला. सीएसटीएम येथून पूर्वमुक्त मार्गाच्या दिशेने जात असताना हा हल्ला झाला होता. हा हल्ला स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा दावा जाधव यांनी केला होता.

अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड

अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना सुपारीबाज असं वक्तव्य केलं होतं. त्यांची ही टीका मनसे कार्यकर्त्यांच्या चांगलीच झोंबली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी संतापात अमोल मिटकरी यांची अकोल्यात गाडीची तोडफोड केली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+