PM मोदी अमेरिकेच्या तालावर मुजरा करतायत, त्यांचे नेतृत्व 'कॉम्प्रोमाईज्ड'; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत बोचरी टीका करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. "पंतप्रधान मोदी हे अमेरिकेच्या तालावर नाचत असून त्यांच्या धोरणांमुळे भारताचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे," असा गंभीर आरोप आंबेडकरांनी केला आहे. मुंबईतील आंदोलनानंतर ट्विटरच्या (X) माध्यमातून त्यांनी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

"मोदींचे नेतृत्व 'कॉम्प्रोमाईज्ड' झाले आहे"
प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या निवेदनात काही खळबळजनक मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या मते, खालील कारणांमुळे देशाची सुरक्षा आणि स्वायत्तता धोक्यात आली आहे.
एपस्टीन फाईल्स प्रकरण: अमेरिकेतील वादग्रस्त 'एपस्टीन फाईल्स'शी संबंधित ईमेलमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव येणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे आंबेडकर म्हणाले.
राफेल खरेदीवर प्रश्न : विना 'सोर्स कोड' अत्यंत महागड्या किमतीत राफेल विमाने खरेदी केल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि नेतृत्वाच्या क्षमतेवर त्यांनी शंका उपस्थित केली आहे.
आर्थिक व्यापार : भारताच्या हितापेक्षा अमेरिकेला झुकते माप देणारे आर्थिक करार केले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
काँग्रेसला दिला 'धडा' घेण्याचा सल्ला
मुंबईत वंचित बहुजन आघाडीने मोदी सरकारविरोधात काढलेल्या मोर्च्याचा उल्लेख करत आंबेडकर म्हणाले की, "गेल्या १२ वर्षांत जे राष्ट्रीय पक्षांना, विशेषतः काँग्रेसला जमले नाही, ते धाडस वंचितने करून दाखवले आहे. आम्ही जनतेच्या संतापाचा पाया रचला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आरएसएसविरोधात काढलेल्या मोर्च्यानंतर आता मुंबईतील आंदोलनाने भाजप सरकारला मोठा धक्का दिल्याचे त्यांनी नमूद केले.
"एप्रिलपर्यंत दोन रिल्स बाहेर काढणार" - मोठा इशारा
प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींना थेट इशारा दिला आहे की, एप्रिल महिन्यापर्यंत त्यांच्याशी संबंधित दोन 'रिल्स' सार्वजनिक केले जातील. "पंतप्रधान मोदी, एप्रिलपर्यंत थांबा. तुमच्या दोन रिल्स बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जर या रिल्स बाहेर येऊ द्यायच्या नसतील, तर मोदींनी सन्मानाने खुर्ची रिकामी करावी. भारताचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी भाजपने मोदींना पायउतार करावे," असे आवाहन त्यांनी केले.
शेतकरी आणि गरिबीचा मुद्दा
देशातील ३५ टक्के जनता अद्याप दारिद्र्य रेषेखाली जगत असताना मोदींचे काही महिन्यांपूर्वीचे भाषण आणि प्रत्यक्ष करार यात मोठी तफावत आहे. अमेरिकेसोबतच्या करारामुळे भारतीय शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम सुरू असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला.












Click it and Unblock the Notifications