PM मोदी महाराष्ट्र दिनी मुंबईत; Wavesसमिटमध्ये मराठीत शुभेच्छा! PM काय म्हणाले 6 मुद्यांत जाणून घ्या
PM Modi in mumbai addresses Waves Summit 2025 : "भारतीय अन्न जगाचे आवडते बनत आहे, येत्या काळात भारताचे गाणे देखील जगाची ओळख बनेल." असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी मुंबई दौऱ्यावर आहेत. आजपासून मुंबईत जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) सुरू झाली आहे. या शिखर परिषदेचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी यांनी केले. त्यावेळी ते बोल होते. चार दिवसीय या संमेलनाला चित्रपट क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती सहभागी झाले आहेत.

1. स्थापना दिनाच्या मोदींकडून मराठी आणि गुजरातीत शुभेच्छा
महाराष्ट्र दिनाच्या मराठीत शुभेच्छा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर गुजरातच्या स्थापना दिनानिमित्तही त्यांनी गुजरातीत शुभेच्छा दिल्या. यासह "भारतीय अन्न जगाचे आवडते बनत आहे, येत्या काळात भारताचे गाणे देखील जगाची ओळख बनेल." असे त्यांनी म्हटले आहे.
LIVE | Special address by Hon PM Narendra Modi Ji at the inauguration of 'WAVES 2025'
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 1, 2025
🕛 12.10pm | 1-5-2025📍Mumbai.@narendramodi#Maharashtra #Mumbai #WAVES2025 https://t.co/br7n64xLvF
2. व्हेव्ज हा संस्कृती,आदानप्रदानाचा जागतिक सेतू
व्हेव्ज समिटमध्ये ते म्हणाले, आज मुंबईत शंभरापेक्षा जास्त देशाचे आर्थिक इनोव्हेटर, गुंतवणूकदार आणि धोरणकर्ते एकाच छताखाली एकत्र आले आहेत. आज येथे ग्लोबल टॅलेंट आणि ग्लोबल परिसंस्थेची बिजं रोवली जात आहे. व्हेव्ज हे एक व्हेव्जआहे ते सांस्कृतिकता, जागतिक संपर्कतेचा सेतू आहे.
3. भारतीय कला जगाच्या पसंतीस
काल दादासाहेब फाळकेंचा जन्मदिवस होता, भारतीय सिनेमाला जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्यात त्यांचा आणि इतर चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे, सत्यजित रे, राजकपूर यांचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. ए. आर. रहेमानची धून असो की, राजामौलीची महागाथा जगातील कोट्यवधी लोकांची पसंद बनली आहे.
4. रोबोट नव्हे तर संवेदनशील बना
तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असताना जगात मानवी संवेदना जागृत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत WAVES परिषदेच्या उद्घाटनावेळी केली. माणसांना robot नव्हे तर अधिक संवेदनशील बनवायची गरज आहे. हजारो वर्षे गीत, संगीत, नृत्य या कामी आपली मदत करत असून आगामी काळात पण त्याच आधारे आपल्या राहायचे आहे, असं त्यांनी सांगितलं.
5. देशात सध्या ऑरेंज इकॉनॉमी चा उदय होतोय
देशात सध्या ऑरेंज इकॉनॉमी चा उदय होतो आहे. त्यात कंटेंट, creativity आणि culture हे महत्वाची भूमिका बजावणार आहेत असं ते म्हणाले. त्यासाठी सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. यामुळे देशाच्या GDP मध्ये creative Economy चा हिस्सा वाढायला मदत होईल, असं त्यांनी सांगितल.
6. भारत हा अब्जावधी कथांचा देश
भारत हा अब्जावधी कथांचा देश आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात आणि संस्कृती, परंपरा यांच्यात लाखो कथा सामावलेल्या आहेत. आगामी पिढ्यासाठी या कथा जगासमोर ठेवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. त्यासाठी waves परिषद महत्वाची आहे. यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या युवकांना संधी मिळेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. Waves मध्ये होत असलेल्या विविध स्पर्धा मधील स्पर्धकांना त्यांनी अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या तसच भाषणाच्या सुरुवातीला मराठीतून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.












Click it and Unblock the Notifications