Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पूरग्रस्तांच्या मदतीवर राजकारण; संकटातही शिवसेनेचा मदत कीटवर प्रचार, शिंदेंचे फोटो; भाजपची नाराजी

flood relief kits Politics, Ekanath Shinde : मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आणि सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत मदतीचा हात पुढे करत शिंदे गटाने पूरग्रस्तांसाठी मदत सामग्री पाठवली, मात्र या मदतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो छापल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी यावर टीकेची झोड उठवली आहे, तर शिंदे यांनी राजकारण न करता मदतीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.

मदत साहित्यावर फोटो, शेतकऱ्यांचा संताप

ठाणे आणि मुंबईहून धाराशिव जिल्ह्यासाठी पाठवण्यात आलेल्या मदत सामग्रीच्या पॅकेट्सवर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो छापलेले आहेत. या प्रकारामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. "मागील तीन दिवसांपासून आमच्याकडे कोणीच फिरकले नाही, आता आम्हाला तुमची मदत नको," असे म्हणत काही शेतकऱ्यांनी मदत स्वीकारण्यास नकार दिला. मात्र, दुसरीकडे अनेक गरजूंनी ही मदत विनातक्रार स्वीकारली.

flood relief kits Politics

ठाकरे गटाचा आरोप: 'प्रसिद्धीचा सोस'

ठाकरे गटाने या घटनेवरून शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. "जेव्हा पूर आला तेव्हा सरकार अदृश्य झाले होते, पण आता मदतीच्या नावाखाली हे लोक स्वतःचा प्रचार करत आहेत," असा आरोप ठाकरे गटाने केला. आपत्तीच्या काळात अशा प्रकारे प्रसिद्धी मिळवणे हे अयोग्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

शिंदे यांचे प्रत्युत्तर: 'फोटो नव्हे, मदत पाहा'

या टीकेला एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले. त्यांनी राजकारण बाजूला ठेवून मदतकार्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. "सध्या लोक एका कपड्यावर आहेत. त्यांना कपडे, जीवनावश्यक वस्तू, धान्य आणि भांडी देणे आपले कर्तव्य आहे," असे ते म्हणाले. मदतीच्या बॅगवर छापलेल्या फोटोंबद्दल बोलताना, "तुम्ही बॅगमध्ये काय आहे, ते पाहा, फोटोंकडे लक्ष देऊ नका," असा सल्ला त्यांनी टीका करणाऱ्यांना दिला.

शिंदे यांनी या संकटाला 'अस्मानी संकट' असे संबोधले आणि सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून, ९८ हजार हेक्टर जमिनीच्या नुकसानीची माहिती घेतली असून, पंचनामे करून तातडीने मदत देण्याचे आश्वासन दिले.

भाजपचाही जाहिरातबाजीपासून दूर राहण्याचा सल्ला

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मदतकार्यात जाहिरातबाजी करू नये असे म्हटले आहे. "हा मते मिळवण्याचा प्रसंग नाही, लोकांना आधार देणे हे प्रमुख काम आहे," असे ते म्हणाले. त्यांनी विरोधकांना टोमणे मारण्याऐवजी मदतीसाठी काय केले, हे विचारले.

या संपूर्ण घटनेमुळे नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतकार्यातही राजकीय जाहिरातबाजी आणि आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू असल्याचे दिसून येते. गरजूंना तातडीने मदत पोहोचवणे महत्त्वाचे असताना, मदतीच्या स्वरूपावरून होणाऱ्या या वादामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+