परभणी हादरले! झाडाखाली गप्पा मारणाऱ्या तरुणीवर 6 नराधमांनी केला गॅंगरेप; व्हिडिओही चित्रित!
Parbhani district Jintur crime news : परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी संस्थान इटोली परिसरात दि. १४ ऑक्टोबर रोजी एक अत्यंत संतापजनक आणि गंभीर घटना उघडकीस आली आहे.
झाडाखाली एकमेकांशी गप्पा मारत बसलेल्या एका तरुणीवर सहा नराधमांनी सामूहिक अत्याचार केला, तसेच या घटनेचा व्हिडिओही चित्रित केल्याचे समोर आले आहे.
या घृणास्पद घटनेमुळे संपूर्ण परभणी जिल्हा सुन्न झाला असून, जिंतूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व सहा आरोपींना अटक केली आहे.

नेमका प्रकार काय घडला?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी तरुणी आणि तिचा मित्र भोगाव देवी संस्थान इटोली शिवारातील एका निर्जन ठिकाणी झाडाखाली बसून गप्पा मारत होते.
त्याच वेळी करण, शेषेराव, साबेर, मुन्या, अर्जुन आणि लखन हे सहा जण अचानक तिथे आले. यापैकी अर्जुन आणि लखन यांनी तरुणीसोबत असलेल्या तरुणाला पकडून ठेवले. तर करण, शेषेराव आणि साबेर या तिघांनी तरुणीवर सामूहिक अत्याचार केला.
नराधमांनी संपूर्ण घटनेचे व्हिडिओ शूट केला
शारीरिक अत्याचारानंतर आरोपींनी पीडित तरुणीकडून पाच हजार रुपये देखील काढून घेतले.
पोलिसांची तत्परता आणि गुन्हा दाखल
या घटनेनंतर पीडित तरुणी किंवा तिच्या कुटुंबीयांनी भीतीमुळे पोलिसात तक्रार दिली नव्हती. मात्र, जिंतूर पोलिसांना गोपनीय माहिती मिळताच त्यांनी तात्काळ वेगाने चौकशी सुरू केली.
पोलिसांनी पीडित तरुणीला विश्वासात घेऊन तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत गुन्हा दाखल केला.याप्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता (IPC) 2023 च्या कलम 376(1), 126(1), 310 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66(इ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन विनीवाल यांच्या नेतृत्वाखाली विशेष 8 पथके स्थापन करून पोलिसांनी अत्यंत वेगाने कारवाई केली आणि घटनेतील सर्व सहा आरोपींना अटक केली आहे.
अटकेत असलेल्या आरोपींमध्ये अर्जुन दत्तराव बटकुले, शेख साबेर शेख सत्तार आणि शेषराव दत्तराव शेवाळे यांचा समावेश आहे.
पालकमंत्री मेघना बोर्डीकर काय म्हणाल्या?
या घटनेनंतर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "भोगाव देवीच्या समोर जाताना जो जंगल एरिया आहे, तिथे ही मुलं गेली होती. या परिस्थितीचा फायदा घेत पाच-सहा मुलांनी अत्याचार केला आहे. आरोपींना तातडीने पकडण्यात आले आहे आणि त्यांना धाक बसेल अशीच शिक्षा होईल.
"पालकमंत्र्यांनी यावेळी तरुणाईलाही आवाहन केले. "कोणीच जात-येत नाही अशा ठिकाणी ती लोकं गेली होती. समाजामध्ये विकृत मानसिकतेच्या लोकांची संख्या वाढत आहे.
सरकारने कायदे आणले आहेत, पोलीस तत्पर आहेत. परंतु, समाज म्हणून सुद्धा आपण सगळ्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. मुलींना माझी विनंती आहे की, त्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार सर्वात आधी केला पाहिजे," असे मत त्यांनी व्यक्त केले.












Click it and Unblock the Notifications