मी कुणालाही घाबरत नाही, पराभवाने खचून जात नाही, ही तुमची लेक नवा डाव टाकणार - पंकजा मुंडे कडाडल्या
भगवानबाबा गडावर भाजप नेत्या तथा आमदार पंकजा मुंडे यांनी सातव्यांदा सलग दसरा मेळावा घेतला. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी आपण राजकारणात कशासाठी आलो आहे, याची भूमिका स्पष्ट केली. मी राजकारणात पैसा कमविण्यासाठी आलेले नाही. मी कुणालाही घाबरत नाही. असेही त्या म्हणाल्या. तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मी राज्यातील कानाकोपऱ्यात जाणार आहे. अनेकांच्या प्रचाराची जबाबदारी मी घेणार आहे, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मुंडे समर्थकांची अलोट गर्दी भगवानबाबा गडावर लोटली. यंदाचे दसरा मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दसरा मेळाव्याला एकत्रित आले. पंकजा मुंडे यांनी उघड्या जीपमधून गडावर एन्ट्री घेतली. लाखो समर्थकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये ही यात्रा गडावर पोहोचली.
त्यांंना प्रभू रामचंद्रही माहिती असायला हवेत
भगवानगडाच्या भूमिपूजनाला 1907 साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते. त्यावेळी यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की तुमच्या नावातच भगवान आहे. त्यामुळे या गडालाही भगवान गड असेच नाव हवे, असे यशवंतराव चव्हाण म्हणाले होते. दसरा मेळाव्याची परंपरा फक्त बीड जिल्ह्यात नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा जगात प्रसिद्ध आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी चालू केलेला मुंबईतील दसरा आहे. एकनाथ शिंदे साहेबांचाही मेळावा आहे. भगवानगडावरचाही एक दसरा मेळावा आहे. लोकशाही आहे. मी म्हणालो आनंद आहे. दसरा ज्याला माहिती आहे, त्याला प्रभू रामचंद्रही माहिती असायला हवेत. त्यामुळे पुढचं मी काही बोलणार नाही. तुम्ही समजून घ्या, असे धनंजय मुंडे म्हणाले.

भलेही 12 वर्षे जमलं नसेल, पण मी वेगळा दसरा घेण्याचा कधीही विचार केला नाही
धनंजय मुंडे म्हणाले की, आपलं भलेही 12 वर्षे जमलं नसेल. पण मी वेगळा दसरा घेण्याचा कधीही विचार केला नाही. कारण ज्याला जो वारसा दिला आहे, त्यानेच तो चालवावा. आज दसरा मेळाव्याला आलेला समुदाय एकसंघ झाला तर मी आपल्याला सांगतो की कोणीही नवा दसरा मेळावा चालू करून या मेळाव्याची पवित्रता घालवू शकत नाही. संघर्ष आपल्या पाचवीला पुजलेला आहे. संघर्षाच्या काळात आपण एक राहणं गरजेचं आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.












Click it and Unblock the Notifications