विरार बिल्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला! आतापर्यंत 17 जण ठार, CM फडणवीसांकडून 'एवढी' मदत जाहीर
Palghar Virar Building Collapse Update 17 people dead so far : वसई-विरार भागात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत ही इमारत कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. यासह मृतांच्या नातेवाईकांना सरकारी पातळीवर मदतही जाहीर केली.

वसई-विरार भागात एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झालेला आहे, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे सांगतानाच मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केली आहे.
४८ तासांपासून एनडीआरएफच्या मदतीने दुर्घटनास्थळी बचाव कार्य
४८ तासांपासून एनडीआरएफच्या मदतीने दुर्घटनास्थळी बचाव कार्य राबवले जात असून पुढच्या काही तासात ते संपेल. आतापर्यंत ९ जणांना सुरक्षित वाचविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान, माहितीनुसार, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे विरारच्या दुर्घटना स्थळी दुपारी अडीच वाजता भेट देणार आहे.
वाढदिवस साजरा करताना घटना
मिडिया रिपोर्टनुसार, वृत्तानुसार, जॉयल कुटुंब इमारतीच्या चौथ्या मजल्यावर त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करत असताना ही घटना घडली. या घटनेत सुरुवातीला मुलाचा आणि त्याच्या आईचा मृत्यू झाला होता, त्यानंतर आता मृतांची संख्या १७ वर पोहचली आहे.
वसईतील नारंगी रोडवरील चामुंडा नगर आणि विजय नगर दरम्यान असलेल्या रमाबाई अपार्टमेंटच्या चार मजली इमारतीचा मागील भाग रात्री उशिरा कोसळला. हा भाग एका चाळीवर कोसळल्यानंतर मोठी प्राणहाणी झाली. या घटनेनंतर वसई विरार महानगरपालिका अग्निशमन विभाग आणि एनडीआरएफच्या 2 पथकांच्या मदतीने बचावकार्य केले असून अजूनही सरकारी यंत्रणा खबरदारी घेत आहेत.
मुंबईतील वसई-विरारमध्ये चार मजली इमारतीत अनेक रहिवाशी राहत होते, जेव्हा दुर्घटना घडली तेव्हा सुमारे १५ ते २० जण ढिगाऱ्यात अडकल्याची भिती व्यक्त केली जात होती ती भिती खरी ठरली. ही इमारत मुंबईतील वसई-विरार येथील गणपती मंदिराजवळ असून स्थानिक लोक आणि पोलिसांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य करण्यात आले आता या भागात मंत्री गिरीश महाजन पाहणी करणार आहेत.
हेही वाचा : गणेशउत्सवाच्या सुरुवातालीच मुंबईत मोठी दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळून 'इतके' ठार 20 जण ढिगाऱ्यात दबले
ताजे अपडेट्स..
- वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने अलीकडेच केलेल्या सर्व्हेक्षणाचा आधार घेता दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अंदाजे ६ ते ७ रहिवाशी अजुनही अडकल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
- पिडीत नागरीकांची तात्पुरती राहण्याची आणि भोजनाची संपुर्ण सोय महानगरपालिकेच्या चंदनसार समाजमंदिरात करण्यात आली आहे.
- घटनास्थळावर वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, महसुल प्रशासन, एन.डी.आर.एफ च्या दोन टीम पुर्णवेळ मदत कार्यात व्यस्त आहेत.












Click it and Unblock the Notifications