गणेशउत्सवाच्या सुरुवातालीच मुंबईत मोठी दुर्घटना! 4 मजली इमारत कोसळून 'इतके' ठार 20 जण ढिगाऱ्यात दबले
Mumbai vasai virar building collapse : गणेशउत्सवाच्या सुरुवातीलाच मुंबईत मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईतील वसई-विरारमध्ये चार मजली इमारत कोसळली असून सुमारे २० जण ढिगाऱ्यात अडकले आहेत. सध्या बचावकार्य सुरु आहे. ही घटना २६ ऑगस्टला मंगळवारी रात्री घडली आहे.
मुंबईतील वसई-विरारमध्ये चार मजली इमारतीत अनेक रहिवाशी राहत होते, जेव्हा दुर्घटना घडली तेव्हा सुमारे १५ ते २० जण ढिगाऱ्यात अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. ही इमारत मुंबईतील वसई-विरार येथील गणपती मंदिराजवळ असून स्थानिक लोक आणि पोलिसांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे.

#BREAKING_NEWS: A four-storey residential building has #collapsed in #Virar East. Several people are feared trapped under the debris. MBVV police & civic officials are on-site as rescue operations are underway. Residents in nearby buildings say they woke up to a loud thud. pic.twitter.com/coEsBiPmlF
— Diwakar Sharma (@DiwakarSharmaa) August 26, 2025
लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु
अग्निशमन दल आणि एनडीआरएफ पथके घटनास्थळी पोहोचली आहेत आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात गुंतली आहेत. शेजारी आणि रस्त्याने जाणाऱ्यांच्या मदतीने ढिगाऱ्यात अडकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृत्यू किंवा दुखापतीची अद्याप पुष्टी झालेली नाही, परंतु अधिकाऱ्यांच्या मते, सुमारे २० जण ढिगाऱ्यात अडकले असण्याची शक्यता आहे.
Palghar, Maharashtra | The rear part of the four-storey building of Ramabai Apartment, located between Chamunda Nagar and Vijay Nagar on Narangi Road in Vasai, collapsed late last night. Rescue work is underway with the help of Vasai Virar Municipal Corporation Fire Department…
— ANI (@ANI) August 27, 2025
एनआयच्या वृत्तानुसार, या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर ढिगाऱ्यातून 11 जणांना वाचवण्यात आले आहे. ढिगाऱ्यातून बाहेर काढलेल्या लोकांना विरारमधील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, जिथे एनडीआरएफ, अग्निशमन दलाची टीम तसेच स्थानिक पोलिस कर्मचारी देखील उपस्थित आहेत.
वसईतील नारंगी रोडवरील चामुंडा नगर आणि विजय नगर दरम्यान असलेल्या रमाबाई अपार्टमेंटच्या चार मजली इमारतीचा मागील भाग काल रात्री उशिरा कोसळला. वसई विरार महानगरपालिका अग्निशमन विभाग आणि एनडीआरएफच्या 2 पथकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे, असे पालघर पोलिसांच्या हवाल्याने एनआयने वृत्त दिले आहे.
वाढदिवस साजरा करताना घटना
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, जॉयल कुटुंब इमारतीच्या चौथ्या मजल्यावर त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करत असताना ही घटना घडली. या घटनेत मुलाचा आणि त्याच्या आईचा मृत्यू झाला, तर वडील ओंकार जॉयल आणि कुटुंबातील इतर सदस्य अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले होते, असे सांगण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications