Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

हिंदू कोण विचारलं अन् काका-बाबांना गोळ्यांनी उडवलं; डोंबिवलीच्या मुलीने सांगितला पहलगामचा थरार

Pahalgam Terror Attack: काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी देशभरातून आलेल्या पर्यटकांना लक्ष्य केले. त्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 नागरिकांचाही समावेश आहे.

मुंबईतील डोंबिवली येथील अतुल मोने आणि त्यांच्या दोन मित्रांचा मृतांमध्ये समावेश आहे. अतुल मोने यांची मुलगी आणि पत्नीसमोरच दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली. त्या दिवशी केवळ 15 मिनिटांत मोने, जोशी अन् लेले कुटुंबातील कर्त्या पुरुषांना गोळ्या घातल्या गेल्या. या थरारक घटनेवर अतुल मोने यांची मुलीने भाष्य केले. ते सांगताना तिच्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हते तर तिला न नीट बोलता येत होतं. डोळ्यादेखल बाबा अन् दोन काकांना संपवलं गेलं.

Pahalgam terror attack

काय म्हणाली अतुल मोने यांची मुलगी?

मयत अतुल मोने यांची मुलगी ऋच्या मोनेने या घटनेबाबत माध्यमांशी बोलताना सांगितले की, सगळं काही सुरळीत चालू होतं, लोक आनंदाने त्या ठिकाणी खेळत बागडत होेते. अचानक पहेलगाममध्ये असलेल्या ठिकाणी गोळीबार सुरू झाला. सगळ्यांना काय झाले ते कळत नव्हते. मी दोन जणांना गोळीबार करताना पाहिले.

ऋचा पुढे बोलताना म्हणाली की, ते विचारत होते, हिंदू कोण? माझे संजय काका (संजय लेले) यांनी हात वरती केला. त्या दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या मारल्या. मग माझे हेमंत काका (हेमंत जोशी) काय झाले हे विचारले गेले. त्यांनाही त्यांनी गोळी मारली. मग माझे बाबा (अतुल मोने) ही त्यांना बोलले. गोळ्या मारू नका, आम्ही काही करणार नाही. मात्र बाबांनादेखील माझ्यासमोर गोळी झाडली. मी काहीच करू शकले नाही, अशी ती म्हणाली हे सांगताना तिच्या डोळ्यातील अश्रु थांबत नव्हते. हुंदके येत होते.

स्थानिकांनी मदत केली

ऋचा पुढे बोलताना म्हणाली की, या हल्ल्यानंतर स्थानिक लोकांनी मदत केली. बाबांना गोळी लागली. ते गेल्यानंतर आम्ही बाबांना उठवायचा प्रयत्न केला. मात्र, बाबा उठत नव्हते. त्यांना उठाता येत नव्हते. त्यावेळेला आम्हाला त्या ठिकाणी असलेली लोक बोलली. ज्यांना गोळ्या लागल्या, त्यांना घेण्यासाठी आर्मी येईल. तुम्ही या ठिकाणावरुन आधी निघत सुरुक्षित ठिकाणी जा. त्यामुळे आम्ही तिथून निघालो. पण बाबा काकांना सोडून जावेसे वाटत नव्हते. पण काही कळण्याच्या आतच हे सर्व काही घडले होते.

दहशतवाद्यांना संपवा, आम्हाला न्याय द्या

ऋचा मोने म्हणाली की, काश्मीरमध्ये काही महिन्यांपूर्वी आई-बाबा जाऊन आलेले होते. त्यामुळे काश्मीर सुरक्षित असल्याचे आम्हाला वाटत होते. दुसऱ्यांदा आम्ही गेलो. परंतु त्यात सर्वस्व गमावले. आम्हाला शासनाकडून न्याय हवा. दहशतवाद्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी देखील तिने केली.

दहशतवाद संपवावा, अतिरेक्यांचा बिमोड व्हावा

अतुल मोने यांच्या पत्नी अनुष्का म्हणाल्या, आम्ही तीन कुटुंब फिरायला गेलो. अचानक गोळीबार झाला. त्यामुळे आम्हाला काही सुचले नाही. आमच्या घरातील करता माणूस गेलेला आहे. सरकारकडे आमची एकच मागणी आहे, दहशतवाद संपवावा...अतिरेक्यांचा बिमोड करा...

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+