नेपाळ बस अपघातात महाराष्ट्रातील 14 जणांचा मृत्यू
Nepal bus accident : नेपाळमधून अपघाताची बातमी समोर आली आहे. 40 भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी बस शुक्रवारी तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळली आहे. या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहीती आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 14 जणांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार तनहुन जिल्हा पोलीस कार्यालयाचे डीएसपी दीपकुमार राय यांनी सांगितले की, बस नदीच्या काठावर पडली आहे. "यूपी एफटी 7623 नंबर प्लेट असलेली बस नदीच्या काठावर पडली आहे." ही बस पोखराहून काठमांडूला जात होती.
उत्तर प्रदेशच्या मदत आयुक्तांनी सांगितले की, अधिकारी या दुर्घटनेत उत्तर प्रदेशमधील कोणी सामील आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. रिपोर्टनुसार ही बस गोरखपूरहून निघाली होती आणि तानपुनजवळ अपघात झाला. घटनास्थळावरून समोर आलेले व्हिडिओ हृदय हेलावून टाकणारे आहेत.

नदीतील पाण्याचा प्रवाह जोरदार सुरू असून बचावकार्य सुरू आहे. सशस्त्र पोलिस दल नेपाळ आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शाळेतील वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) माधव पौडेल यांच्या नेतृत्वाखालील 45 सशस्त्र पोलिस दलाच्या कर्मचाऱ्यांचे पथक आधीच अपघातस्थळी पोहोचले आहे आणि ते बचाव कार्य करत आहेत.
#WATCH | Nepal: An Indian passenger bus with 40 people onboard has plunged into the Marsyangdi river in Tanahun district. The bus was en route to Kathmandu from Pokhara. Search and rescue operations underway by the Nepal Army at the incident site.
— ANI (@ANI) August 23, 2024
(Video Source: News Agency… pic.twitter.com/txxO43O4CV
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या मदत आयुक्तांनी सांगितले की, "नेपाळमधील घटनेबाबत. बसमध्ये उत्तर प्रदेशातील कोणी व्यक्ती आहे का, हे शोधण्यासाठी आम्ही संपर्क प्रस्थापित करत आहोत."
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्टिट
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेपाळ बस अपघाताबद्दल एक ट्टिट करुन माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्टिट म्हटलं आहे की, "नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींना लवकर आराम पडावा, अशी प्रार्थना करतो.
प्रारंभिक माहितीनुसार, हे भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याचे कळते आहे. राज्य सरकारने तत्काळ नेपाळ दुतावासाशी संपर्क साधला असून, जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकार्यांशी सातत्याने संपर्कात आहेत." असं ट्टिट फडणवीस यांनी केलं आहे.












Click it and Unblock the Notifications