बदलापूरचे "बलात्कारपूर" करायला घेतले आहे की काय? आव्हाडांचा संतप्त सवाल
मुंबई : बदलापूरात दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पालक आणि जनतेच्या संतापाचा उद्रेक झाला. मात्र अल्पवयीन मुली आणि महिलांवरील लैंगिक अत्याचारी आणखी काही प्रकरणे उकडकीस आहे.
बदलापूरमध्येच एका 11 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिचा गर्भपात करण्यात आली अद्याप आरोपीला अटक झाली नसल्याचा आरोप राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) चे नेते डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी केली असून, "सुसंस्कृत बदलापूरचे नाव आता सत्ताधारी आणि पोलिसांनी "बलात्कारपूर" करायला घेतले आहे की काय?" असा सवाल देखील केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियात एक पोस्ट लिहिली असून यात धक्कादायक दावा केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, नेपाळहून बदलापुरात पोट भरण्यासाठी आलेल्या एका नेपाळी कुटुंबातील अकरा वर्षाच्या चिमुरडीवर इमारतीचे काम करणाऱ्या ठेकेदाराने आईबापाला ठार मारण्याची धमकी देत तसेच तिला मारहाण करीत जुलै महिन्यात बलात्कार केला.

ही चिमुरडी गर्भवती राहिल्यानंतर गुन्हा दाखल करून जे.जे. रूग्णालयात गर्भपात करण्यात आला. नराधमाची पूर्ण माहिती असतानाही त्याला पोलिसांनी अटक केली नाही. तिच्या पालकांना पैशाचे अमिष दाखवण्यात आले पण त्यांनी ते धुडकावले. पोलिसांनीही या पीडित कुटुंबाला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांचे घरही पाडण्यात आले असे अनेक दावे या जितेंद्र आव्हाड यांनी या पोस्टमध्ये केले आहेत.
जितेंद्र आव्हाडांची पोस्ट
"सुसंस्कृत बदलापूरचे नाव आता सत्ताधारी आणि पोलिसांनी "बलात्कारपूर" करायला घेतले आहे की काय, असा संशय निर्माण होऊ लागला आहे. बदलापुरात शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आलेले असतानाच आपल्या राज्याची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावरही बदनाम झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पोट भरण्यासाठी नेपाळहून बदलापुरात आलेल्या एक् नेपाळी कुटुंबातील अकरा वर्षाच्या चिमुरडीवर इमारतीचे काम करणाऱ्या ठेकेदाराने आईबापाला ठार मारण्याची धमकी देत तसेच तिला मारहाण करीत जुलै महिन्यात बलात्कार केला. ही चिमुरडी गर्भवती राहिल्यानंतर गुन्हा दाखल करून जे.जे. रूग्णालयात गर्भपात करण्यात आला. नराधमाची पूर्ण माहिती असतानाही त्याला पोलिसांनी अटक केली नाही. त्यामुळे ही मुलगी रूग्णालयात असताना मुलीच्या कुटुंबियांना सुरूवातीला पैशांचे अमीष दाखवण्यात आले. पण, ते या अमीषाला न बधल्याने नंतर धमक्या देण्यास सुरूवात झाली. हे कुटुंब रूग्णालयात असताना त्यांचे बदलापुरातील घर पाडण्यात आले.
या नेपाळी कुटुंबाने पोलिसांच्या पायावर डोके ठेवून नराधमाला अटक करण्याची विनंती करून न्यायाची मागणी केली. पण, पोलिसांनी नराधम फरार आहे, आम्ही काय करणार? अशी उत्तरे दिली. अखेर आपल्या दुसऱ्या मुलीच्या जीवाच्या भयाने हे नेपाळी कुटुंब दहा दिवसांपूर्वी नेपाळला गेले आहे. आताही त्या कुटुंबाला गुन्हा मागे घे, असे सांगत धमकावले जात आहे.
हे काय चालले आहे, सुसंस्कृत महाराष्ट्राची अशी बदनामी जगभर होऊ लागली आहे. गरीब घरातील मुलींधा बापजाद्यांची संपत्ती समजून त्यांच्या इभ्रतीशी खेळत आहेत आणि हे सत्ताधारी उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. पोलीस आजही त्या नेपाळी कुटुंबाला फोन करून धमकावत आहेत. आता जर अशा घटनांना पायबंद घालण्याऐवजी पोलीस पीडितांना धमकावत असतील तर कायद्याचे राज्य राहिले आहे का? या पापाला तो नराधम जेवढा जबाबदार आहे तेवढेच सत्ताधारी आणि पोलीसही जबाबदार आहेत. आज सत्ताधारी आणि पोलीस नराधमाला वाचवतील पण नियती कधीच माफ करणार नाही !"












Click it and Unblock the Notifications