महायुती सरकारचे काळे कारनामे! 'या' पक्षाने अख्खं पुस्तकच छापलं!
मुंबई : हिट अँड रन प्रकरणात सर्व श्रीमंताची मुलं असून त्यांना वाचवण्याचं काम महायुतीचं सरकार करत आहे. गुन्हेगारीत महाराष्ट्राला देशात नंबर वन या सरकारने बनवलं अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली विशेष म्हणजे महायुती सरकारचे काळे कारनामे या नावाने अख्ख पुस्तकच राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाने छापले आहे.
'काळे कारनामे'वरुन हल्लाबोल
महाराष्ट्रविरोधी भूमिका घेणा-या महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा मुद्देसूद लेखाजोखा सांगणा-या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार' पक्षातर्फे प्रकाशित 'महायुतीचे काळे कारनामे' या पुस्तिकेचे अनावरण आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. यावेळी आमदार जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांनी राज्यातील शिंदे- फडणवीस- पवार सरकारमधील घोटाळे, बेरोजगारी, गुन्हेगारी घटनांवर भाष्य करत सरकारवर हल्लाबोल केला आहे.
महायुतीविरुद्ध एल्गार करणार
पत्रकार परिषदेत जयंत पाटील म्हणाले की, आम्ही माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हे कँपन लॉन्च करत आहोत. त्यात लोक त्यांची मतं मांडू शकतात. त्याचा जाहीरनामा बनवताना विचार केला जाईल. 19 जुलैपासून 15 ऑगस्टपर्यंत हे कँपेन लागू राहिल. महायुतीचे काळे कारनामे नावाने पुस्तक बनवून महायुतीविरोधात एल्गार करणार आहोत. यावेळी काळे फुगे फोडून महायुती सरकारचा निषेधही करण्यात आला.
5 महिन्यात 1073 शेतकरी आत्महत्या
जयंत पाटील म्हणाले की, राज्यामध्ये गेल्या 5 महिन्यांत तब्बल 1073 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र देशात एक नंबरवर पोहोचला आहे. तर गुन्हेगारीच्या बाबतीतही हे महायुतीच्या सरकारने महाराष्ट्राला देशात अव्वल स्थानावर नेऊन ठेवले आहे. तसेच, एकीकडे महागाई वाढत चालली असताना शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा खर्च निघत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल आहेत, हे डबल नाहीतर
ट्रबल इंजीनच सरकार आहे.
श्रीमंतांच्या मुलांना वाचवले!
जयंत पाटील म्हणाले की, या सरकारने गुन्हेगारीतही महाराष्ट्राला एक नंबरवर नेऊन ठेवले आहे. डेटानुसार महाराष्ट्र दंगली घडवण्यात प्रथम क्रमांकावर आहे. खुनात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर बलात्कारामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. हे आकडे पाहिल्यावर समजेल या लोकांनी कुठं महाराष्ट्र नेऊन ठेवला आहे. हिट अँड रन प्रकरणात सर्व श्रीमंतांची मुले होती. श्रीमंतांच्या मुलांना वाचवण्याचे काम या सरकारने केले.
रात्रभर ठाण्यात बसत नाही..
जयंत पाटील म्हणाले, आमचा कोणताही कार्यकर्ता किंवा आमदार रात्रभर कुणासाठी पोलीस ठाण्यात बसत नाही. आमचा कोणताही कार्यकर्ता कुणाचे रक्त बदलण्याचा फंदात पडत नाही. ते सत्ताधारी आहेत. त्यांच्या जवळ सर्व श्रीमंत लोकं आहेत त्यांना सोडवण्यात ते व्यस्त असतात.












Click it and Unblock the Notifications