भाजपच्या वाट्याला 120 ते 130 जागाच मिळणार! मित्रपक्षांची चलती - जयंत पाटील
मुंबई - भाजपने दोन मित्रपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. मात्र या मित्रपक्षांमुळे भाजपच्या वाटेला विधानसभेला 278 पैकी 120 ते 130 जागांवरच समाधान मानावे लागेल असे चित्र आहे, तर उरलेल्या जागा ह्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला द्यावा लागतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले. माध्यमांशी वार्ताल करताना त्यांनी सरकारी धोरणावर टीका केली.
94 हजार कोटींचा नवा भुर्दंड
जयंत पाटील सभागृहात बोलताना म्हणाले, 94 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या एका शब्दाचीही चर्चा न करता मंजूर करण्यात आल्या. सभागृहात सत्तारूढ पक्षाने गोंधळ घातला आणि सभागृह तहकूब करत महाराष्ट्राच्या माथ्यावर 94 हजार कोटींचा नवा भुर्दंड मारला आहे. या पुरवणी मागण्यांना विरोधी पक्ष नाकारतील याची खात्री असल्याने हा पळपुटेपणा सरकारने केला आहे.

तुम्हाला घाबरण्याची गरज काय
जयंत पाटील म्हणाले की, मंगळवारी मराठा-ओबीसी आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. यापूर्वीही दोन बैठका झाल्या होत्या. महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी वारंवार भूमिका स्पष्ट केली होती. वास्तविक विधान परिषद आणि विधानसभेतील विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन एकमताने या बैठका घेणे अपेक्षित होते, तर त्याला योग्य स्वरूप आले असते. मात्र त्यांनी कोणतीही चर्चा केली नाही.
सरकारने मराठा आणि ओबीसी समाजातील घटकांशी चर्चा केली. त्यांनी याबाबतीत काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. ठोस निर्णय न घेता, विरोधी पक्ष बैठकीला आला नाही याचा कांगावा करण्यात काहीच अर्थ नाही. तुमच्याकडे 206 आमदारांचे बहुमत आहे. त्यामुळे सभागृह चालवताना घाबरण्याचे काही कारण नाही.
रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावा
आज सकाळी सभागृहात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ग्रामपंचायतीची थकबाकी सरकारने भरावी. वित्तआयोगाची त्यासाठी मदत घ्यावी. महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायतीचे रस्ते विजेशिवाय आहे. वीज नसल्याने रस्त्यावर जाताना गंभीर प्रकार भोगावे लागतात. त्यामुळे नागरीकांच्या सोईसाठी सरकारने रस्त्यांचे प्रश्न निकाली लावावे असेही जयंत पाटील यांनी आज सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासावेळी म्हटले आहे.
जयंत पाटील म्हणाले, जयप्रकाश दांडेगावकर यांनी राजू नवघरेंना आमदार केले आहे. त्यांचे नाव त्यांनीच सूचवले होते. या कार्यकाळात जी काम झाले ते मी मंत्री असताना दिलेल्या निधीचे कामे एकत्र झाले असतील. पण ते शरद पवारांसोबत आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications