Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नवल किशोर राम पुणे महापालिका आयुक्तपदी, राज्यात आठ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्र प्रशासनात मोठा खांदेपालट झाला असून, राज्य सरकारने आठ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी बदली म्हणजे नवल किशोर राम यांची पुणे महापालिका आयुक्तपदी झालेली नियुक्ती होय. याआधी पंतप्रधान कार्यालयात प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेले नवल किशोर राम, आता पुन्हा एकदा पुणे शहराच्या प्रशासनाची धुरा सांभाळणार आहेत.

Nawal Kishore Ram

कोण आहेत नवल किशोर राम?

नवल किशोर राम हे २००८ बॅचचे IAS अधिकारी असून, मूळचे बिहार राज्यातील चंपारण जिल्ह्यातील मोतीहारी गावचे रहिवासी आहेत. त्यांनी सुरुवातीला IPS अधिकारी म्हणून सेवा सुरू केली होती, परंतु नंतर त्यांनी IAS सेवेमध्ये प्रवेश केला.

त्यांची प्रशासकीय कारकीर्द नांदेड जिल्ह्यातून सुरू झाली आणि त्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये दोन वर्षे कार्य केले. जिल्हाधिकारी म्हणून बीड आणि औरंगाबाद (आताचे छत्रपती संभाजीनगर) येथे त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.

२०२० मध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना, कोविड-१९ महामारीच्या काळात त्यांनी अत्यंत सक्रिय भूमिका घेतली होती. गावोगावी जाऊन प्रत्यक्ष पाहणी आणि निर्णय घेणाऱ्या या अधिकाऱ्याच्या कार्याची देशपातळीवर दखल घेण्यात आली होती. त्यामुळे त्यांना देशातील सर्वोत्तम जिल्हाधिकाऱ्यांपैकी एक मानलं गेलं. त्यानंतर त्यांची नियुक्ती थेट पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर करण्यात आली होती.

आता पुन्हा पुण्याची जबाबदारी

डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निवृत्तीनंतर पुणे महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी नवल किशोर राम यांच्याकडे देण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेसारख्या महत्त्वाच्या शहरी संस्थेचे नेतृत्व करणे ही एक मोठी जबाबदारी मानली जाते, विशेषतः महानगरात विकास प्रकल्प, नागरी सेवा आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी प्रभावी प्रशासन आवश्यक असते.

राज्यभरात अन्य मोठ्या प्रशासकीय बदल्या

या बदल्यांमध्ये इतर काही महत्त्वाच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत:

शीतल तेली-उगले - क्रीडा आणि युवा सेवा आयुक्त, पुणे

जे. एस. पापळकर - विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर

सी. के. डांगे - सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग

सौरभ कटियार - जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर

भाग्यश्री विसपुते - जिल्हाधिकारी, धुळे

आशिष येरेकर - जिल्हाधिकारी, अमरावती

आनंद भंडारी - मुख्य कार्यकारी अधिकारी, अहिल्यानगर जिल्हा परिषद

प्रशासनात बदल्यांचा जोर

यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये देखील प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. अलीकडेच ३२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये कृषी, पाणीपुरवठा, बांधकाम, महिला व बालकल्याण, तसेच सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेल्या बदल्या आता सुरू झाल्यामुळे, कर्मचारी वर्गात काही प्रमाणात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+