Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नाशिकमध्ये भरधाव कंटनेरची कारला धडक, अपघातात 2 मुली आणि जावयाचा मृत्यू

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगावच्या वाके शिवारात एक मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दोन मुली आणि जावयाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.तर एक चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगावच्या वाके शिवारात हा घडला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nashik accident

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावरील मालेगावच्या वाके शिवारात वडिलांच्या अंत्यविधीसाठी येत असताना दोघी मुली व जावयाचा भीषण अपघातात मृत्यू झाला. उभ्या असलेल्या कंटेनरवर कार जावून धडकल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात मीनाक्षी अरुण हिरे, सुनंदा विकास सावंत, विकास चिंतामण सावंत या तिघांचा मृत्यू झाला. तर नात वैभवी प्रवीण जाधव ही गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी चिमुकलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान कालच नाशिकमध्ये सिटी लिंक बसखाली येऊन चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. तर दोन दिवसांपुर्वीच नाशिक मधील गंगापूर रोड येथील बारदान फाटा परिसरात एका ३१ वर्षीय महिलेला चार चाकी गाडीने धडक देत पलायन केले होते.या धडकेत ३१ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+