Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Nashik News : दर्गा हटवण्याचा वाद! नाशिकमध्ये तुफान दगडफेक, 21 पोलिस जखमी, बुलडोजरने पाडले बांधकाम

Nashik News Dargah removal controversy : नाशिक महापालिकेने दर्ग्याचे बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश दिल्यानंतर नाशिक शहरात हिंसक संघर्ष उसळला, ज्यात 21 पोलिस जखमी झाले, तर 57 दुचाकींचे नुकसान झाले आहे. या अफवांमुळे जमावाने दगडफेक केली. पोलिसांनी 15 जणांना अटक केली आहे. तर दुसरीकडे दर्गा हा 350 वर्षे जुना असल्याचा दर्गा कमिटीचा दावा आहे.

Nashik News Dargah removal controversy

कुठे घडला हा प्रकार?

नाशिक शहरातील व्दारका जवळील काठेगल्ली सिग्नल भागात काल रात्री बारा वाजेच्या सुमारास जमावाने अचानक दगडफेक केली. यामुळे एकच गोंधळ उडाला, जवळपास या दगडफेकीत 21 पोलिस जखमी झाले असून पोलिसांच्या 3 वाहनांची मोडतोड करण्यात आली आहे.

अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

दरम्यान दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास स्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, या सिग्नल जवळ असलेल्या बेकायदेशीर दर्गाचे बांधकाम आज सकाळी महापालिकेच्या मदतीने शांततेत हटवण्यात आले.

वीज पुरवठा बंद असल्याने साधली संधी

नाशिक शहरातील या भागात बेकायदेशीर दर्गा हटवण्यापूर्वी पोलीसांनी काल रात्री वाहतू्क मार्गात बदल करण्यासाठी बॅरेकेडेस उभारण्यास प्रारंभ केला होता. याच दरम्यान, काठे गल्ली परीसरात वीज पुरवठा बंद असल्याने जमवाने जोरदार दगडफेक केली. वीज नसल्याचे पाहून हल्लेखोरांनी संधी साधली.

काय म्हणाले नाशिक पोलिस?

नाशिक पाेलीसांनी स्पष्ट केले की, या दगडफेकीच्या घडनेट 21 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत, 3 पोलिसांच्या वाहनांची मोडतोड करण्यात आली. त्यानंतर राज्यराखीव दलाची कुमक देखील येथे दाखल झाली आहे, जमाव पांगवल्यानंतर स्थीती नियंत्रणात आली आहे. दरम्यान, आज सकाळी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दर्गाचे अनाधिकृत बांधकाम हटवल्याचे महापालिकेच्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास नाशिक पोलिसांनी दर्गाच्या अनाधिकृत बांधकामाची पाडापाडी हाती घेतली. त्यानंतर दर्ग्याच्या भिंती पाडल्या. दरम्यान या भागात झालेला मोठा ढिगारा आता हटवला जात आहे तर दुसरीकडे पोलिस विभागाकडून या भागात चोख सुरक्षा व्यवस्था, बंदोबस्त लावण्यात आला आहे.

मेळाव्यात विघ्न, ठाकरे गटाकडून संताप...

आज नाशिकमध्ये ठाकरे गटाचा निर्धार मेळावा आहे. या मेळाव्यात अडथळा आणण्यासाठी आजच ही कारवाई केल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. या कारवाईसाठी आजचा दिवस कसा सापडला असा सवाल शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊतांकडून करण्यात आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+