"गणेश नाईकांना शिवसेना संपवण्याची परवानगी द्याच, आम्हीही बघतोच"; शिंदेंच्या खासदारांचे भाजपला आव्हान

Eknath Shinde Vs Ganesh Naik controversy : महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. नवी मुंबईचे भाजपचे दिग्गज नेते गणेश नाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचला आहे. "पक्षाने परवानगी दिली तर शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकू," या गणेश नाईकांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, त्याला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी अत्यंत आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.

Naresh Mhaske statement

नरेश म्हस्के यांचे भाजप प्रदेशाध्यक्षांना खळबळजनक पत्र

गणेश नाईकांच्या विधानाचा समाचार घेण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना जाहीर पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी नाईकांचा समाचार घेतानाच भाजप नेतृत्वाला एकप्रकारे आव्हान दिले आहे. म्हस्के म्हणाले, "मी तमाम शिवसैनिकांच्या वतीने विनंती करतो की, गणेश नाईकांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना शिवसेना संपवण्याची परवानगी देऊनच टाकावी. आम्हीही त्यांना उत्तर द्यायला पूर्णपणे सज्ज आहोत."

"नाईकांना आनंद दिघेंच्या धोबीपछाडीची आठवण करून द्या"

पत्रात जुन्या आठवणींना उजाळा देत म्हस्के यांनी नाईकांवर बोचरी टीका केली. ते म्हणाले, धर्मवीर आनंद दिघे साहेब असताना शिवसेनेने गणेश नाईकांना कशी धोबीपछाड दिली होती, याचे स्मरण त्यांनी एकदा करून घ्यावे. "नवी मुंबईत शिवसेनेच्या १० जागाही निवडून येणार नाहीत," असे म्हणणाऱ्या नाईकांना आम्ही ४२ जागा निवडून आणून दाखवल्या आहेत. कदाचित याच अस्वस्थतेतून ते अशी विधाने करत आहेत. महायुतीचे सरकार आणण्यात एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा आहे. मोदी-शहांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे-फडणवीस काम करत आहेत, हेच नाईकांना बघवत नाहीये.

शिंदेंमुळेच भाजप नेत्यांवरील गंडांतर टळले

नरेश म्हस्के यांनी पत्रात महाविकास आघाडीच्या काळातील संदर्भाचाही उल्लेख केला. "महाबिघाडीच्या सरकारने देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि अन्य भाजप नेत्यांवर खोटे आरोप लावून गंडांतर आणण्याचा प्रयत्न केला होता. पण एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि युतीचे सरकार आले, म्हणूनच त्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देता आले," असे म्हणत त्यांनी युती धर्माची आठवण करून दिली.

नाईकांचा भाजपवरच अविश्वास आहे का?

गणेश नाईक ज्या पद्धतीने मित्रपक्षावर टीका करत आहेत, त्यावर बोट ठेवत म्हस्के यांनी विचारले की, "नाईक हे पक्षाची रचना आणि अध्यक्षांचे निर्णय जुमानत नाहीत. कधीकधी तर वाटते की शिंदे साहेबांपेक्षा गणेश नाईकांचाच आपल्या पक्ष नेतृत्वावर अविश्वास आहे. दुसरे म्हणजे आता नरेश म्हस्के यांच्या या आक्रमक पत्रानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कोणती भूमिका घेतात आणि गणेश नाईक या आव्हानाला कसे उत्तर देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+