Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'या' दोन मंत्र्यांनी जाणीवपूर्वक बंद पाडले मराठा महामंडळाचे पोर्टल? अजितदादांवर पुन्हा मोठा आरोप

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (MD) विजयसिंह देशमुख यांनी या दोन मंत्र्यांच्या सांगण्यावरून महामंडळाचे पोर्टल जाणीवपूर्वक बंद ठेवले. यामुळे सुमारे 15,000 मराठा तरुणांना महामंडळाच्या योजनांचा लाभ घेता आला नाही, असा खळबळजनक दावा पाटील यांनी केला आहे.

narendra patil alleges ajit pawar chhagan bhujbal blocked annasaheb patil mahamandal portal

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून 'कटकारस्थान'?

नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना थेट अजित पवार यांच्यावरही टीका केली. "अजित पवारांकडे काही मागितलं की त्यांना वाटतं मी पैसे मागायला आलोय, त्यामुळे ते कायम चिडचिड करतात," असे ते म्हणाले.

पाटील यांचा दावा आहे की, गेल्या 1 ऑक्टोबरपासून महामंडळाची वेबसाईट बंद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या माध्यमातून हे पोर्टल बंद ठेवण्याचं कटकारस्थान रचलं जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

हजारो तरुणांच्या भविष्यावर परिणाम

  • पोर्टल बंद असल्याने लाभार्थ्यांची नोंदणी, कर्जप्रक्रिया, पात्रता प्रमाणपत्र वाटप आणि व्याज परतावा यांसारखी सर्व कामं ठप्प झाली आहेत.
  • दिवाळीच्या काळात अनेक तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाहन खरेदीसाठी कर्ज घ्यायचे होते, पण पोर्टल बंद असल्याने त्यांना ही संधी गमवावी लागली.
  • एकट्या नाशिक जिल्ह्यातच 16 हजारांहून अधिक तरुण लाभापासून वंचित राहिले आहेत. राज्यभरातील वंचित लाभार्थ्यांचा आकडा यापेक्षा कितीतरी पटीने मोठा असल्याचा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला.

निधीबाबतही गंभीर आरोप

नरेंद्र पाटील यांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. महामंडळाच्या नावाने 300 ते 350 कोटी रुपयांपर्यंतचा निधी बँकांमध्ये ठेवला जातो, परंतु व्याजाचा परतावा लाभार्थ्यांना न करता, काही अधिकारी बँकांमध्ये पैसे 'पार्क' करून त्याचा फायदा घेत आहेत, असा त्यांचा गंभीर आरोप आहे.

या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संदेश पाठवला असून, मराठा समाज उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनाही माहिती दिली आहे.

महामंडळाचा आतापर्यंतचा लाभ

दरम्यान, या महामंडळाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील लाभार्थ्यांना सन 2018 पासून आतापर्यंत 1,277 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात आलं असून, त्यावर 127 कोटी रुपयांचा व्याज परतावा देण्यात आला आहे. राज्यभरात आतापर्यंत सुमारे 4 लाख नोंदणीकृत अर्जदारांपैकी दीड लाखाहून अधिक लाभार्थ्यांना कर्ज मिळालं असून, महामंडळाने एकूण 1,037 कोटी रुपयांचा व्याज परतावा केला आहे.

या गंभीर आरोपांमुळे राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+