Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पंतप्रधान मोदींचा घाणाघात; म्हणाले, जे पाकिस्तानला हवंय तेच काँग्रेस करतंय...

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिमूर येथील जाहीर सभेला संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला बुलढाणा जिल्ह्यातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता. आपल्या भाषणाला मराठीतून सुरवात करताना मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

काँग्रेसवर साधला जोरदार निशाणा

पीएम मोदी म्हणाले, 'काँग्रेस आणि आघाडीचे लोक देशाला कमकुवत करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आम्ही जम्मू- कश्मीरचे कलम 370 रद्द केले. काश्मीर पूर्णपणे भारत आणि भारतीय राज्यघटनेशी जोडला. पण काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष काश्मीरमध्ये 370 पुन्हा लागू करण्याचा ठराव पास करत आहेत. जे पाकिस्तानला हवे आहे तेच काम हे लोक काम करत आहेत. फुटीरतावाद आणि दहशतवादात आपला जम्मू-काश्मीर अनेक दशके जळत राहिला. मातृभूमीचे रक्षण करताना महाराष्ट्राचे अनेक शूर जवान जम्मू-काश्मीरच्या मातीवर शहीद झाले. कोणत्या कायद्याच्या आडून, कोणत्या कलमाच्या आड हे सर्व घडले, ते कलम 370 होते. हे कलम 370 ही काँग्रेसची देणगी होती, अशी सणसणीत टीका मोदींनी केली.

Maharashtra Assembly Election 2024

नक्षलवादावर केले परखड भाष्य

काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या काळात येथे नक्षलवाद वाढला. आम्ही त्याला आळा घातला. आज हा संपूर्ण परिसर मोकळा श्वास घेतोय. चिमूर आणि गडचिरोली परिसरात नवीन संधी निर्माण होताहेत. या भागात नक्षलवाद पुन्हा प्रबळ होऊ नये, यासाठी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना येथून हाकलून लावा. आपल्या चंद्रपूरच्या या भागानेही अनेक दशकांपासून नक्षलवादाच्या आगीचा सामना केला आहे. नक्षलवादाच्या दुष्टचक्रामुळे येथे अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. हिंसाचाराचा रक्तरंजित खेळ सुरूच राहिला, येथील औद्योगिक शक्यता मरून गेल्या, असा घाणाघातही मोदींनी केला

काँग्रेसला समाजात फूट पाडातय

पंतप्रधान मोदी म्हणाले, "भाजप आणि महायुती सरकार 'सबका साथ-सबका विकास' या मंत्रावर काम करत आहे. मला गरिबांच्या जीवनातील अडचणी समजतात, त्यामुळे तुमचे जीवन सुकर करण्यासाठी मी रात्रंदिवस काम करत आहे. आज मी तुम्हाला काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या एका मोठ्या षडयंत्राबाबत चेतावणी देत ​​आहे. आपल्या देशात आदिवासी समाजाची लोकसंख्या 10% च्या आसपास आहे. काँग्रेसला आता आदिवासी समाजाला जातींमध्ये विभागून कमकुवत करायचे आहे. काँग्रेस आपल्या आदिवासी बांधवांची एसटी म्हणून असलेली ओळख नष्ट व्हावी, त्यांच्या बळावर त्यांनी निर्माण केलेली ओळख मोडीत काढावी, अशी आमची इच्छा आहे.

शेतकऱ्यांना दाखवली नवी स्वप्ने

मोदी म्हणाले, महाराष्ट्र समृद्ध करण्यासाठी शेतकऱ्यांना समृद्ध बनवायचे आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळत आहे. महायुती सरकार नमो शेतकरी योजनेचा लाभही देत ​​आहे. तुम्ही एकजूट राहिला नाही, तुमची एकजूट तुटली, तर तुमचे आरक्षण हिसकावून घेणारी काँग्रेसच पहिली असेल. आपण या देशावर राज्य करण्यासाठी जन्माला आलो, अशी मानसिकता काँग्रेसच्या राजघराण्यात नेहमीच राहिली आहे. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने दलित, मागासवर्गीय, आदिवासींना पुढे जाऊ दिले नाही. आरक्षणावरून काँग्रेस चिडली आहे. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+