पराभवाच्या भितीने भाजपकडून पैसे वाटप! पैशातून मते विकत घेणाऱ्यांना जनताच धडा शिकवेल- नाना पटोले
Nana Patole's criticism of BJP and Vinod Tawde : "सत्ताधारी पक्षाकडून सरकारी यंत्रणांचा प्रचंड गैरवापर होत असून निवडणूक आयोगाने कोणाच्याही दबावाखाली येऊ नये. पराभवाच्या भितीने भाजपकडून पैसे वाटप सुरु असून भ्रष्ट मार्गाने तेपैशातून मते विकत घेत आहेत, त्यांना जनताच धडा शिकवेल, तूर्त पैसे वाटणाऱ्या विनोद तावडे, भाजपवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी" अशी मागणी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
भाजपचे राष्ट्रीय नेते पैसे वाटताहेत! - पटोले
नाना पटोले म्हणाले, निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून सरकारी यंत्रणांचा वापर केला जात असून पोलिस वाहनातून रसद पाठवल्याच्या बातम्याही आल्या. आतातर भाजपाचे राष्ट्रीय नेते माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचे उघड झाले आहे. भाजप शिंदे सरकारचा सपशेल पराभव होत असल्याने आता ते भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशाच्या जोरावर जनतेची मते विकत घेऊन निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न असून भाजपचा खरा चेहरा उघडा पडला. निवडणूक आयोगाने याप्रकरणी भारतीय जनता पक्ष व विनोद तावडे यांच्यावर कठोर कारवाई करावी."

निवडणूक आयोगाने कडक कारवाई करावी
नाना पटोले म्हणाले, "10 नोव्हेंबर रोजी विरारच्या हॉटेल विवांतामध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. ही रक्कम 5 कोटी रुपये होती, असे सांगण्यात येत आहे, विरारमधील पैसे वाटपाचा हा प्रकार अत्यंत गंभीर आहे, हे प्रकरण दडपण्याचा प्रकार होऊ शकतो पण निवडणूक आयोगाने कोणाच्याही दबावाखाली न येता निष्पक्ष, पारदर्शक व कडक कारवाई करून कायद्याच्या राज्यात सर्व समान आहेत हे दाखवून द्यावे."
सत्ताधारी पक्षांवर कारवाईस टाळाटाळ- पटोले
नाना पटोले म्हणाले, "विधानसभा निवडणुका निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे, परंतु महिना भरातील घटना पाहता सत्ताधारी पक्षांवर कारवाई केली जात नसून फक्त विरोधी पक्षांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या बॅगा तपासणे, त्यांना विमान व हेलिकॉप्टर उड्डाणास परवानगी न देणे, विलंब लावणे असे प्रकार झाले आहेत.
सुरुवातीला तक्रारी केल्यानंतर सत्ताधारी नेत्यांच्या बॅगा तपासल्या जात असल्याचे दाखवण्यात आले. खेड शिवापूर भागात पुणे महामार्गावर 15 दिवसापूर्वी एका वाहनातून 5 कोटी रुपये सापडले पण अद्याप ते पैसे कोणाचे हे पोलिसांनी जाहिर केले नाही, या प्रकरणाचे पुढे काय झाले हेही स्पष्ट झालेले नाही."
सत्ताधाऱ्यांच्या बॅगांमध्ये पैशांचे घबाड सापडण्याचे प्रकार उघड
नाना पटोले म्हणाले, "नाशिकच्या एका हॉटेलातही मोठ्या प्रमाणात पैसे सापडले त्याचा संबंधही सत्ताधारी पक्षाशी असल्याचे उघड झाले पण पोलीस कारवाई समाधान कारक झाली नाही. विरोधकांच्या बॅगांमध्ये काहीही आढलेले नाही पण सत्ताधारी पक्षांच्या बॅगांमध्ये पैशांचे घबाड सापडण्याचे प्रकार उघड झाले आहेत.
राज्याच्या माजी गृहमंत्र्यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली व त्यात ते जखमी झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला हे शोभणारे नाही, निवडणुका जिंकण्याची भाजप-शिवसेना युतीचा प्रयत्न जनताजनार्दन खपवून घेणार नाही."












Click it and Unblock the Notifications