Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Nagpur violence : नागपूर हिंसाचाराचा कट कुणी रचला? तोडफोड कशी झाली! कोण काय म्हणाले? घ्या जाणून

Nagpur violence Who plotted : नागपूर हिंसाचाराची घटना कशी घडली. यामागे काही षडयंत्र होते का, या हिंसाचाराचा कुणी कट रचला असे अनेक प्रश्न समोर आहेत. या प्रश्नांची उकल पोलिस तपासादरम्यान करत आहेत. दरम्यान या घटनेनंतर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर या घटनेशिवाय राज्यात अनेक प्रश्न आहे असे काहीजण म्हणाले तर हे सरकारचे अपयश असल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

नागपूरमध्ये घडलेल्या घटनेमध्ये 33 ते 34 पोलिसांना दगड फेकीमध्ये दुखापत झाली असून 5 नागरिकांनाही इजा झाली असून त्यातील 2 आयसीयूमध्ये भरती आहेत. 45 वाहनांची तोडफोड झाली असून या प्रकरणामध्ये 40 ते 45 जणांना पोलिसांनी अटक केली आहे, दरम्यान अजूनही काहीजणांना अटक होईल, अशी माहिती नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

Nagpur violence Who plotted

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ज्यांनी अफवा पसरवली त्यांचा शोध चालू आहे. नागपूर शहरात कधीही अशी घटना घडली नाही, परंतु ज्या समाजकंटकांनी हे कृत्य केले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे. या घटनेत जखमी झालेले पोलिस आणि नागरिक यांची भेट आपण घेणार आहे असेही त्यांनी सांगितले .

गृह राज्यमंत्री योगेश कदम काय म्हणाले?

गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, नागपूरमध्ये पोलिसांनी आतापर्यंत 47 जणांना ताब्यात घेतले आहे. हिंसाचाराची सुरुवात कशी झाली याचा तपास पोलिस करत आहे. सकाळी तेथे आंदोलन झाले त्यानंतर दुपारी वाद झाल्यानंतर सर्व काही शांत झाले. पोलिसांनी त्या प्रकरणी एफआयआरही घेतला होता, मात्र तब्बल 4 तासानंतर काही टोळके बाहेर आले आणि त्यांनी तोडफोड केली. आरोपींवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. हिंसाचारामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. कट कोणी रचला? ही तोडफोड कशी झाली याचा तपास सुरू आहे.

पोलिसांचे हात बांधलेले - विजय वडेट्टीवार

काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, औरंगजेबाच्या थडग्याबाबत काल सकाळी ज्या प्रकारे आंदोलन झाले, त्यानंतर संध्याकाळी हिंसाचार झाला, त्यावरून सरकारचे अपयश स्पष्ट होते. पोलिसांचे हात बांधलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना नीट काम करता येत नाही. सरकारचे काही मंत्री मोठ्याने बोलले त्यामुळे सामाजिक वातावरण तापले आहे.

..छावा पाहून - अमोल मिटकरी आमदार

काल सकाळपासूनच नागपुरात जसे वातावरण होते. महाराष्ट्रात औरंगजेबाच्या गंभीर प्रकरणापेक्षाही मोठे प्रश्न आहेत; पण आता छावा चित्रपट पाहून 400 वर्षांनंतर काही लोकांना जाग आली आहे. ही दंगल कोणत्याही सरकारचे अपयश आहे, पण हे सरकार काम करून दाखवेल. सरकारच्या काही मंत्र्यांनी विचारपूर्वक विधाने करावीत.

गुप्तचर यंत्रणेचे अपयश - अंबादास दानवे

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे क्षेत्र असलेल्या नागपुरात झालेला हिंसाचार हे गुप्तचर यंत्रणेचे पूर्ण अपयश आहे. राज्यात हिंसाचार भडकावण्याचा भाजपचा उद्देश आहे. सरकार सत्तेवर आल्यापासून ते राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवत आहेत. भाजपचे मंत्री आणि नेते ज्या प्रकारे वक्तव्ये करत आहेत, त्यावरून त्यांना दंगल हवी आहे, असे दिसते.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+