Mumbai rain : मुंबई, उपनगरात मुसळधार पावसाचा तडाखा! लोकल गाड्या लेट, शहराच्या 'या' भागात 'तुंबई'
Mumbai rain : मुंबईत काल रात्रीपासून पाऊस सुरु आहे. रात्रभर आणि सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई ठप्प झाली आहे. शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले असून वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. दरम्यान याचा फटका लोकल ट्रेनला बसत असून काही गाड्या उशीरा धावत आहेत तर काही उशीरा धावण्याचे संकेत आहेत.

एनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरु असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसर पुर्णतः भिजून गेला आहे. यासह कुर्ला, सायन, दादर आणि परळमधील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे, आज पहाटेच्या सुमारास वाहने पाणी साचलेल्या रस्त्यांवरून जाताना दिसत आहेत.
#WATCH | Maharashtra: Heavy rain lashes parts of Mumbai; visuals from Chhatrapati Shivaji Maharaj Terminus. pic.twitter.com/yAauezuXVw
— ANI (@ANI) May 26, 2025
कुठे किती पाऊस?
मुंबईच्या नरिमन पॉइंट परिसरात आज सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत 40 मिमी, ग्रँट रोडवर 36 मिमी, कुलाबा येथे 32 मिमी आणि भायखळ्यात 21 मिमी पाऊस पडल्याची हवामान विभागाची माहिती आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये हलका पाऊस पडत असल्याचेही वृत्त आहे.
#WATCH | Maharashtra: Waterlogging witnessed in parts of Mumbai following heavy rainfall.
— ANI (@ANI) May 26, 2025
(Visuals from JJ flyover) pic.twitter.com/KqhqRHTEQ8
मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी
काल आणि आज पडत असलेल्या पावसामुळे मुंबई तुंबईच्या मार्गावर आहे, यामुळे उपनगरीय रेल्वे सेवा प्रभावित असून काही लोकल गाड्या उशिराने धावत आहेत, सूत्रांनी सांगितले की, वेळापत्रकापेक्षा पाच ते दहा मिनिटे उशिराने लोकल गाड्या धावत आहेत. यासंदर्भात एनडीटीव्हीनेही वृत्त दिले असून त्यानुसार, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कल्याणकडे जाणाऱ्या धीम्या गाड्या पाच मिनिटे उशिराने धावत आहेत, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या जलद गाड्या दहा मिनिटे उशिराने धावत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. हार्बर आणि पश्चिम मार्गावरील रेल्वे सेवांनाही असाच विलंब होत आहे.
'या' भागात मुंबईची 'तुंबई'!
किंग सर्कल, दादर, अंधेरी, वांद्रे, जुहू कोळीवाडा, वडाळा, चेंबूर, कुर्ला, घाटकोपर, बीकेसी आदी भागांमध्येही पाणी साचले असून काही रस्त्यांवरही पाणी साचले आहे त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. वाहनचालक आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंधेरी सबवेमध्ये पाणी भरल्यामुळे तिथली वाहतूक बंद झाली आहे.
District wise Nowcast warnings for next 3-4 hours over Maharashtra: Thunderstorms accompanied with moderate to intense spells of rainfall over districts of North Konkan pic.twitter.com/aq2jMX5keA
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 26, 2025
District wise Nowcast warnings for next 3-4 hours over Maharashtra: Thunderstorms accompanied with moderate to intense spells of rainfall over districts of North Konkan pic.twitter.com/aq2jMX5keA
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 26, 2025काय आहे मुंबई हवामान विभागाचा इशारा?
आज 26 मे रोजी सकाळी 7 वाजता जारी केलेला हवामानाचा इशाऱ्यानुसार, मुंबई जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 तासांत 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह वादळे आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 तासांसाठी जिल्हावार हवामानाचा इशारा देण्यात आला. यामध्ये उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये गडगडाटी वादळासह मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे.

राज्य शासनाचे सतर्कतेचे आदेश
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बारामतीतील पावसाने बाधित भागांना भेट दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले.












Click it and Unblock the Notifications