मुंबई- नागपूर प्रवास 8 तासांत; 'या' दिवशी मोदी करणार 'समृद्धी'चे उद्धाटन, रस्त्याची वैशिष्ट्ये काय?
महाराष्ट्राची राजधानी ते उपराजधानी, हा सुमारे ७०१ किलोमिटरचा प्रवास आता फक्त आठ ते नऊ तासांत करता येणार आहे. वाचून आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे. कारण ज्या प्रवासाला आत्तापर्यंत १६-१७ तास लागत होते तोच वेळ आता निम्म्याने वाचणार आहे. कारण आता पुढील महिन्यांत एमएसआरडीसी अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ इगतपुरी ते ठाणे या ७६ किमी समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण करणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहनांसाठी खुला करण्याची एमएसआरडीसीची योजना आहे.

शेवटच्या टप्प्याचे काम पूर्ण
मुंबई आणि नागपूर दरम्यानच्या ७०१ किमी लांबीच्या महामार्गापैकी ६२५ किमी महामार्ग आधीच खुला झाला आहे. आतापर्यंत ६२५ किमी लांबीच्या या महामार्गावरून २ कोटींहून अधिक वाहने गेली आहेत. एकदा संपूर्ण महामार्ग खुला झाला की, समृद्धीमधून जाणाऱ्या वाहनांची संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. एमएसआरडीसीने पूर्ण झालेल्या ७६किलोमिटरच्या कामाच्या उद्घाटनासाठी सरकारकडे वेळ मागितला आहे. सरकारकडून हिरवा कंदील मिळताच, देशातील सर्वात हाय-टेक महामार्ग वाहनांसाठी पूर्णपणे उपलब्ध होईल. या कामाचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २ मे रोजी करणार असल्याचे सांगितले जात आहे.
काय आहे वैशिष्ट्ये?
१. मुंबई-नागपूर एक्सप्रेसवेचा सर्वात कठीण भाग पूर्ण झाला आहे. भिवंडीतील इगतपुरी आणि आमणे गावामधील शेवटचा टप्पा बांधणे सर्वात कठीण होते. सह्याद्रीच्या खडकाळ प्रदेशातून हा महामार्ग जातो. ते सर्वात कठीण काम पूर्ण करण्यात आले आहे.
२. या महामार्गामुळे सर्वात महत्त्वाचा फायदा होणार आहे तो म्हणजे वेळेची बचत. यापूर्वी मुंबईहून नाशिकला जायला साडेतीन तास लागायचे. मात्र आता हा मार्ग पुर्ण झाल्यानंतर मुंबई ते नाशिक या प्रवासाला फक्त दोन तास लागणार आहे.
३. या महामार्गामुळे ट्राॅफीकच्या समस्येतून वाहनचालकांची सुटका होणार आहे. यापूर्वी मुंबई ते नाशिक आणि नाशिक ते नागपूर या प्रवासात अनेकदा ट्राफीक जॅमची समस्या येत होती. त्यामुळे या प्रवासाला तब्बल १६-१७ तासांचा अवधी लागायचा मात्र आता ट्रफिकची समस्या सुटणार असल्याने हा प्रवास निम्म्या वेळेत पुर्ण होणार आहे.
४. या महामार्गावर सुरक्षा चौक्या उभारल्या जाणार आहेत. सुरक्षा अधिकारी वाहनांच्या टायरची तपासणी, हवेचे दाबा नियंत्रण, प्रवाशांची श्वास चाचणी आदी घेणार आहेत. त्यामुळे हा प्रवास सर्वात सुरक्षित समजला जाणार आहे.
५. या रस्त्याच्या कामासाठी ६२ कमी दाबाच्या वीजवाहिन्या स्थलांतरित करण्यात आल्या. शिवाय ६ प्रमुख केबल्स रूपांतरित करून आणि रेल्वे पायाभूत सुविधांशी यशस्वीरित्या एकत्रित करून बांधकाम आव्हानांवर मात करण्यात आली.
६. मुंबई-नागपूर एक्सप्रेस वेवर चालकांना १००-१२० किमी/ताशी वेगाने वाहने चालवता येतील. तुम्ही मुंबईहून फक्त ८ तासांत नागपूरला पोहोचू शकता. पूर्वी यासाठी १६ ते १७ तास लागायचे. आता हा प्रवास निम्म्या वेळेत करता येणार आहे.
७. मुंबई-नागपूर एक्सप्रेस वे १० जिल्ह्यांमधील २६ तालुके आणि ३९२ गावांमध्ये पसरलेला आहे. मुंबई आणि नागपूरपर्यंतच्या १४ अतिरिक्त जिल्ह्यांमधील प्रवेश सुधारला आहे. या भागातील शेती व उद्योगधंद्यांना त्यामुळे नवी झळाळी येणार आहे.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications