Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लै भारी..! मुंबईतील लोकल प्रवास होणार ठंडा-ठंडा कुल-कूल; सरकार मुंबईकरांसाठी करणार 'असे' काही...

मुंबईसह महाराष्ट्रात रेल्वे जाळे विस्तारले जात आहे. मुंबईतील कामगार वर्गाला दिलासा देण्यासाठी भारतीय रेल्वे शहरातील नेटवर्कमध्ये २३८ नवीन एसी गाड्या समाविष्ट करणार अशी माहिती, केंद्रीय रेल् मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत शुक्रवारी ते बोलत होते.

local train news in Mumbai

काय म्हणाले वैष्णव?

"संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्रासाठी अनेक प्रकल्प सुरू आहेत. मुंबईसाठी लवकरच २३८ नवीन एसी गाड्यांचे उत्पादन सुरू होईल. ही शहर वाहतुकीत आणखी एक मोठी सुधारणा असेल. मुंबई वन कार्डमध्ये रेल्वेचाही समावेश केला जाईल. एकूणच, महाराष्ट्रात रेल्वे नेटवर्क खूप वेगाने वाढेल," असे वैष्णव म्हणाले. मुंबईत अनेक रेल्वे प्रकल्प वेगाने प्रगतीपथावर आहेत. सीएसएमटी ते कुर्ला दरम्यानचा पाचवा आणि सहावा मार्ग, मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यानचा सहावा मार्ग आणि कल्याण ते आसनगाव दरम्यानचा चौथा मार्ग हे १७,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा भाग आहेत, अशी माहितीही वैष्णव यांनी दिली.

मुंबई नेटवर्कमध्ये सुधारणा

वैष्णव यांनी सांगितले की, या वर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला २३,७७८ कोटी रुपये वाटप करण्यात आले. याउलट २००४-२०१४ या काळात राज्याला रेल्वे अर्थसंकल्प म्हणून फक्त १,१७१ कोटी रुपये मिळले होते. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला २० पट जास्त रक्कम मिळत आहे. हे राज्याच्या रेल्वे नेटवर्कमध्ये पूर्णपणे सुधारणा करण्यासाठी एक परिवर्तन आहे. त्यांनी पुढे सांगितले की, मनमाड ते जळगाव दरम्यान चौथी लाईन २,७०० कोटी रुपयांना मंजूर करण्यात आली आहे. भुसावळ ते खंडवा दरम्यान तिसरी आणि चौथी लाईन ३,५०० कोटी रुपयांना मंजूर करण्यात आली आहे. आता, गोंदिया-बल्हारशाह लाईनचे दुपदरीकरण ४,८०० कोटी रुपयांना मंजूर करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध रेल्वे प्रकल्पांमध्ये एकूण १,७३,८०४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे," असेही त्यांनी सांगितले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+