मोदींचा महाराष्ट्र दौरा, कॉंग्रेसच्या नेत्यांना घरातच स्थानबध्द, वर्षा गायकवाड यांचं ठिय्या आंदोलन
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज पालघरमधील वाढवण बंदराचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी यासाठी मुंबई काँग्रेसतर्फे आज आंदोलन करण्याची हाक दिली आहे. त्यानंतर माजी मंत्री आणि कॉंग्रेस नेते अस्लम शेख आणि नसीम खान यांना पोलिसांनी स्थानबध्द केलं आहे.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी सकाळी घरातचं स्थानबध्द केले आहे. त्यानंतर त्यांनी घराबाहेरचं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. वर्षा गायकवाड यांनी शिवाजी पार्कच्या मैदानाव आंदोलन करु देण्याची विंनती होती. त्यानंतर पोलिसांनी त्याची विंनती मान्य करत त्यांनी पोलिस व्हॅनमधून शिवाजी पार्क मैदानावर सोडण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.

मुंबई कॉंग्रेसकडून आंदोलनाची घोषणा केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली येत आहे. तर वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. जेरबंद केले तरी आंदोलन करणारच, अशी भूमिका खासदार वर्षा गायकवाड यांनी घेतली आहे.
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. हा पुतळा कोसळल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली. या घटनेनंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौ-यावर येत आहेत. मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलचं पेटलं आहे. शिवप्रेमींमध्ये संतपाची लाट आहे.












Click it and Unblock the Notifications