Mumbai Boat Accident: बोट दुर्घटनेची पोलीस आणि नौदल चौकशी करणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून मदत जाहीर
Mumbai Boat Accident: मुंबईजवळील बुचर बेटावर नौदलाच्या बोटीची 'नीलकमल' या प्रवासी जहाजाला टक्कर झाली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 10 नागरिक आणि 3 नौदलाच्या जवानांचा समावेश आहे. त्याचबरोबर 101 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
या अपघातावर शोक व्यक्त करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या अपघाताची पोलीस आणि नौदल चौकशी करतील. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून शोकाकूल कुटुंबांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली.

मुंबईतील बोट दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
The Prime Minister has announced an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF for the next of kin of each deceased in the boat mishap in Mumbai. The injured would be given Rs. 50,000. https://t.co/EPwReaayYk
— PMO India (@PMOIndia) December 18, 2024
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईजवळील बुचर बेटावर येथे काल दुपारी 3.55 च्या सुमारास नौदलाच्या बोटीची 'नीलकमल' या प्रवासी जहाजाशी टक्कर झाली. काल सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 101 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई शहराजवळ अरबी समुद्रात नीलकमल कंपनीच्या एका प्रवाशी बोटीच्या अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत सायं. 7.30 पर्यंत प्राप्त माहितीनुसार, बोटीतील एकूण प्रवाशांपैकी 101 लोकांना सुरक्षित वाचविण्यात आले आहे. नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या… https://t.co/JMSVccvFg5
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 18, 2024
13 मृतांमध्ये 10 नागरिक आणि 3 नौदलाचे कर्मचारी आहेत. दोन जण गंभीर जखमी असून, त्यांना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नौदल, तटरक्षक दल आणि पोलिसांनी 11 क्राफ्ट आणि 4 हेलिकॉप्टर वापरून बचावकार्य सुरू केले आहे. बेपत्ता झाल्याची अंतिम माहिती आज मिळणार आहे.
शोकग्रस्त कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांची सानुग्रह रक्कम दिली जाईल. या संपूर्ण घटनेची पोलीस आणि नौदल चौकशी करणार आहे. त्याचवेळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, मुंबईत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. बोट जिथून निघाली ते ठिकाण, गेटवे ऑफ इंडिया, माझ्या विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे. असे अपघात पुन्हा घडू नयेत यासाठी सखोल चौकशी करून उपाय योजना तयार करण्याची गरज आहे.












Click it and Unblock the Notifications