Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महायुती सरकारची न भुतो न भविष्यती मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना! मिळतात वर्षाला मोफत 3 गॅस सिलिंडर

Mukhyamantri Annapurna Yojana : लोककल्याणकारी योजना आणि महायुती सरकार हे समीकरण आता ठरलेलेच. राज्यातील जनतेनेही महायुती सरकारच्या योजनांना भरघोस पाठींबा दर्शवला एवढेच नाही तर या योजना जनेतेनेच लोकप्रियही केल्या. जनहिताच्या योजना राबवणारे सरकार म्हणून महायुती सरकारची ओळख कधीच पुसणार नाही. कारण महायुती सरकारने सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या. त्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो की, एसटी बसमध्ये महिलांना 50 टक्के सवलत, मुलींना विनामुल्य उच्च शिक्षण देण्यासारखे निर्णय असो महायुती सरकारने नेहमीच लोकांचे मदतगार म्हणून भूमिका निभावली.

महायुती सरकारने विधानसभेत 28 जूनमध्ये अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. महायुती सरकारच्या या कार्यकाळातील हा अखेरचा अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पामध्ये सरकारकडून अनेक लोकप्रिय योजनांबाबत घोषणा करण्यात आली. या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या काही घोषणांमध्ये एक घोषणा न भुतो न भविष्यती ठरली ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेने अनेक गरीब, होतकरु आणि हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना आधार दिला, यासह समाजातील सर्वच जनसामान्यांना मोठा आधार या योजनेने मिळाला.

Mukhyamantri Annapurna Yojana Free 3 gas cylinders to 52 lakh families in year

अन्नपुर्णा योजनेचा उद्देश

देशातील स्त्रियांना धुरमुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटूंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करुन स्त्री सक्षमीकरण करणे, या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन-२०१६ मध्ये सुरु करण्यात आली. सदर योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅसजोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरु आहे.

महाराष्ट्रात सद्यः स्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅसजोडणी घेतलेले तसेच, सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅसजोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. तसेच, एक सिलिंडर संपल्यानंतर दुसरे सिलिंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे, परिणामी ते वृक्षतोडीला आळा घालून पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना आणली आहे.

अन्नपुर्णा योजनेचा 52 लाख 16 हजार 412 कुटुंबांना लाभ

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचा लाभ 52 लाख 16 हजार 412 कुटुंबांना लाभ कुटुंबांना लाभ देण्यावर सरकारने जोर दिला आहे. अतिरिक्त अर्थसंकल्पात यासंदर्भात भूमिका महायुती सरकारने या योजनेचा उद्देशही सांगितला आहे तसेच ही योजना पर्यावर संरक्षणासाठी सहाय्यभूत ठरणार आहे . या योजनेंतर्गत राज्य सरकारच्या वतीने राज्यातील सुमारे 52 लाखांहून अधिक कुटुंबांना दरवर्षी तीन-तीन गॅस सिलिंडर मोफत उलब्ध करून देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

महिलांच्या उत्थानासाठी अन्नपुर्णा योजना

महिलांच्या आरोग्याशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी ही योजना फायद्याची ठरत आहे. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबध असतो. त्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी त्यांना स्वच्छ इंधन पुरवणे जबाबदारी आहे. यासाठी सरकार अन्नपुर्णा योजनेद्वारे एलपीजी गॅस सिलिंडर देत आहे. स्वच्छ इंधनासाठी एलपीजीचा वापर हा सर्वात सुरक्षित आहे, त्यामुळे त्याचा वापर वाढणेही गरजेचे असल्याने सरकार या योजनेद्वारे महिलांच्या समस्या दूर करत आहे. राज्य सरकारडून गॅस सिलिंडर प्रत्येक कुटुंबाला परवडायला हवा म्हणून, प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जात आहे.

अन्नपुर्णा योजनेतून 'हे' लाभ

  • महायुती सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेमुळे अर्जदाराला वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर मिळतात, पात्र कुटुंबांना मोफत एलपीजी गॅस सिलिंडरचा लाभ घेता येतो. या योजनेतून लाभार्थ्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारते.
  • एलपीजी गॅस सिलिंडर वापरल्यानं स्वयंपाक करण्यास उशीर होत नाही तसंच स्वयंपाकासाठी लाकूड वापरावे लागत नाही.
  • केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असणार लाभार्थी
  • 830 रुपये रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे बँक खात्यात जमा होतात.
  • पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाना वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध
  • गॅस जोडणी महिलेच्या नावाने.
  • केंद्र सरकारच्या 300 रुपये अनुदानाव्यतिरिक्त राज्य शासन 530 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करते.
More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+