पंतप्रधान मोदी विश्वगुरु, त्यांना शेतकरी, महिलांचे किरकोळ प्रश्न विचारु नका; संजय राऊतांचा खोचक टोला
शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका केली आहे. पंतप्रधान मोदी हे विश्वगुरु आहेत त्यांना देशातील शेतक-यांच्या समस्या, महिलांचे प्रश्न, एमपीएससी आंदोलनासारखे प्रश्न विचारू नका, कारण त्यांच्यासमोर मोठे प्रश्न आहे, त्यांना जगात शांतीचा प्रचार करायचा आहे असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.
राउत म्हणाले की, मोदी साहेबांसमोर मोठे प्रश्न आहे पोलंडला गेले आता ते युक्रेनला जाणार आहेत, तिथे ते शांतीचे संदेश देतील ही खूप मोठी गोष्ट आहे. कांद्याचे प्रश्न, दुधाचे महिलांचे प्रश्न ते एमपीएससी आंदोलन असले लहान प्रश्न त्यांना विचारु नये. पीएम मोदी जळगावचा दौरा करणार आहेत मात्र त्यांना कदाचित माहित नाही की, जळगाव मधील शेतकरी अनेक

समस्यांनी त्रस्त आहेत, या जिल्ह्यात खूप शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत पण आपण पंतप्रधान मोदींना असले प्रश्न विचारु नका. असे राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
मुख्यमंत्र्यावरही टीका
संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलतात हे फार गांभीर्याने घेऊ नका. त्यांना फक्त दोन महिनेच सहन करा. त्यांनी फाशीबाबतचं विधान केलं. मात्र अंगाशी आल्यानंतर कुणी तरी त्यांना माहिती पुरवली. पण ती देखील बरोबर नाही. महायुतीतील गद्दार आमदार विधानसभेत दिसणार नाहीत. लोक त्यांना पुन्हा निवडून देणार नाहीत, असंही संजय राऊत यांनी म्हटले.












Click it and Unblock the Notifications