महायुतीत मिठाचा खडा? शिंदेंच्या नेत्याने भाजपच्या सर्व्हेवर फोडले पराभवाचे खापर
Mumbai: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या महायुतीला अपेक्षित यश मिळवता आलेलं नाही. अनेक ठिकाणी महायुतीला मोठा पराभव स्विकारावा लागला. या पराभवाच अजूनही महायुतीकडून चिंतन सुरू आहे. महायुतीतील घटक पक्षांनी या पराभवानंतर एकमेकाकडे बोट दाखवायला सुरूवात केलीय.
दोन दिवसाआधी पार पडलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपला आणि राष्ट्रवादीला पराभवासाठी कारणीभूत ठरवले होते. यानंतर नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याच पहालयला मिळाल. या विधानावर चर्चा थांबत नाही तोच शिंदेंच्या एका आमदाराने भाजपच्या सर्व्हेवर पराभवाचे खापर फोडले आहे.

काय म्हणाले संजय गायकवाड?
माध्यमांशी संवाद साधताना गायकवाड म्हणाले की, आमच्या जागा अचानक बदलल्या गेल्या. ठाणे आणि अमरावतीवरही भाजपकडून दावा केला गेला. त्यामुळे वातावरण खराब झालं होतं. आम्हाला अधिकाधिक जागा मिळाल्या असत्या तर आम्ही 7 वरून 14 जागांवर नक्की गेलो असतो.
आमच्या 15 पैकी 13 ते 14 जागा नक्की आल्या असत्या. भाजपने सर्व्हे केला त्यामुळे हे घडल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. तसेच सर्व्हे केला होता तर तो गुप्त ठेवायला हवा होता. सर्व्हे जाहीर का केला?, असा सवाल देखील गायकवाड यांनी यावेळी उपस्थित केला.
१०० जागा हव्या, कदमांनंतर गायकवाडांचीही मागणी
भाजपच्या लोकांमुळेच आम्हालाही आणि त्यांनाही लोकसभा निवडणुकीत फटका बसला असा आरोप गायकवाड यांनी केला. पुढे ते म्हणाले, आता आम्ही विधानसभेत 100च्या पुढे जागा लढल्या पाहिजे. एकनाथ शिंदे जर 100 जागा लढतील तर 80 जागा जिंकतील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
अजितदादांना सोबत घ्यायचा निर्णय भाजपचा
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात रामदास कदम यांनी केलेल्या विधानावरही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, रामदास कदम जे काही बोलले ते गंमतीने बोलले. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता.
अजितदादांनी आमच्यासोबत येऊ नये असं त्यांना म्हणायचं नव्हतं. तसेच अजितदादांना सोबत घेण्याचा निर्णय हा सर्वस्वी भाजपचा होता असा दावा संजय गायकवाड यांनी केला.
व्होट जिहादामुळे उद्धव ठाकरेंना फायदा
यावेळी गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली. ते म्हणाले, देशातील मुस्लिमांनी व्होट जिहाद केला म्हणून उद्धव ठाकरेंच्या पदरात काहीतरी पडलं. २१ पैकी तुमच्या केवळ ९ जागा निवडून आल्या. या जागा देखील काँग्रेसच्या भरवश्यावर तुम्ही मिळवल्या असल्याची जोरदार टीका गायकवाड यांनी केली.












Click it and Unblock the Notifications