मोदींना अजून "भटकत्या आत्म्याची" भीती, रोहीत पवारांची पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका
मुंबई : महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्व पक्षाला लागले आहेत. राजकीय पक्षाचे राज्यभर दौर सुरु आहेत. या दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकमेंकावर टीका करण्याची एक ही संधी सोडत नाहीत.राज्यात नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रभर फिरुन महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी धडका लावला होता. महायुतीच्या 23 उमेदवारांसाठी मोदींनी 18 सभा आणि मुंबईत रोड शो केला होता. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्यास टाळाटाळ करत आहेत, असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले आहेत रोहीत पवार ?
आ. रोहित पवार यांनी एक सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, "एक-दोन महिन्यात निवडणुका असणाऱ्या राज्यात दोन-तीन दिवसाआड कार्यक्रम घेणारे पंतप्रधान मोदी साहेब निवडणुका जवळ आल्या असतानाही महाराष्ट्रात कार्यक्रमास येणे टाळत आहेत,अशी खोचक टीका रोहीत पवार यांनी केली आहे.
विकासाच्या बाबतीत तसेच बजेटमध्ये केंद्राकडून दुर्लक्षित झालेला महाराष्ट्र आता राजकीय बाबतीतही दुर्लक्षित होत असल्याची चर्चा आहे. राज्यसरकार विरोधात असलेल्या रोषातून महाराष्ट्रात वाहणाऱ्या परिवर्तनाच्या वाऱ्याचा अंदाज केंद्रीय नेतृत्वाला आला असावा किंवा भटकत्या आत्म्याची भीती अजूनही उतरली नसावी, म्हणूनच महाराष्ट्राकडं दुर्लक्ष केलं जात असेल, असं रोहीत पवार यांनी म्हटलं आहे. पण परिवर्तनानंतर लवकरच महाराष्ट्राला राजकीय सुसंस्कृतपणाचं आणि आर्थिक सत्तेचं गतवैभव प्राप्त होईल, याची खात्री आहे" अस रोहीत पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
केंद्रीय सचिवपदी गुजरातमधील काही जवळच्या लोकांची नियुक्ती
देशभरात IAS अधिकाऱ्यांची पदं मोठ्या प्रमाणात रिक्त असताना lateral_entry च्या माध्यमातून केंद्रीय मंत्रालयांमध्ये सचिव पदांच्या 45 जागा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय म्हणजे मूर्खपणाचा कळसच म्हणावा लागेल. lateral entry च्या माध्यमातून गुजरातमधील काही जवळच्या लोकांना तसंच जवळच्या संघटनांशी संबंधित लोकांना आडमार्गाने या महत्वपूर्ण पदांवर बसवून देशाची यंत्रणाच हायजॅक करण्याचा हा डाव आहेच शिवाय यामुळं संविधान, आरक्षण मात्र पूर्णतः धोक्यात येण्याचीही शक्यता आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
असो! या निर्णयातून भाजपचे आरक्षण विरोधी मूलतत्व पुन्हा अधोरेखित झालं, परंतु यामुळं IAS होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मोठ्या जिद्दीने कष्ट करणाऱ्या स्पर्धा परीक्षार्थी युवांचा विचार सरकार करणार आहे की नाही?, असा प्रश्न रोहीत पवार यांनी उपस्थित केला आहे.
देशभरात #IAS अधिकाऱ्यांची पदं मोठ्या प्रमाणात रिक्त असताना #lateral_entry च्या माध्यमातून केंद्रीय मंत्रालयांमध्ये सचिव पदांच्या ४५ जागा #कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय म्हणजे मूर्खपणाचा कळसच म्हणावा लागेल. lateral entry च्या माध्यमातून गुजरातमधील काही जवळच्या लोकांना तसंच… pic.twitter.com/oTfDCpGQ9v
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 19, 2024












Click it and Unblock the Notifications