Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

वाल्मिक कराड बीडचा पालकमंत्री होता... आ. सोळंके यांचा खळबळजक दावा, बीडमध्ये मोर्चा

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आज बीडमध्ये मोठा मोर्चा निघाला. या मोर्चात अनेक नेत्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. याच मोर्चात आ. प्रकाश सोळंके यांनी गंभीर आरोप केला. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा असल्याने त्याला राजाश्रय मिळतोय. १९ दिवसानंतरही त्याला अटक होत नाही. वाल्मिक कराड हा बीडचा कार्यकारी पालकमंत्री होता, असा गंभीर आरोप आ. सोळंके यांनी केला.

Prakash Solanke

काय म्हणाले आ. सोळंके

आ. प्रकाश सोळंके म्हणाले, यापूर्वी अजितदादांना भेटून अनेकदा बीडमधील सामाजिक व राजकीय परिस्थिती मी कानावर घातली होती. धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या व्यवस्थेत वाल्मीक कराड महत्त्वाचा होता. काही वर्तमानपत्रात वाल्मीक कराड यांना कार्यकारी पालकमंत्री गेलं होतं. वाल्मिक कराडच्या थेट कार्यकारी पालकमंत्री असल्यापर्यंत चर्चा होती, असा गंभीर आरोप आ. सोळंके यांनी केला.

कराडवर गंभीर आरोप

आ. सोळंके म्हणाले, खंडणीच्या अनेक गुन्ह्यात वाल्मिक कराडचं नाव आलं. त्यांचा प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप होता, असं प्रशासकीय अधिकारी सांगायचे. अधिकार्‍यांना डायरेक्ट आदेश देऊन काम करायला लावायचे, ही वाल्मीक कराडचे परंपरा होती. संतोष देशमुख यांची हत्येलाही खंडणीचे प्रकरणच कारणीभूत आहे, असे सांगत आ. सोळंके यांनी कराडची कुंडलीच मांडली. धनंजय मुंडे हे चार वर्षे पालकमंत्री होते. मात्र त्यांचे पूर्ण अधिकार वाल्मिक कराडकडेच होते. आता जे काही घडलंय त्याला धनंजय मुंडे यांची कार्यपद्धती जबाबदार आहे, असा आरोप आ. सोळंके यांनी केला.

मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी

जो काही प्रकार घडला त्याला सर्वस्वी धनंजय मुंडे हेच जबाबदार आहेत. त्यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्विकारुन राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रकाश सोळंके यांनी केली. सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील आजच्या मोर्चात अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+