महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भुकंप? ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटाच्या वाटेवर; नेमकी चर्चा काय?
महाराष्टाच्या राजकारणात पुन्हा एकदा भुकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाचे नऊ पैकी सहा खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याच्या चर्चा आहेत. येत्या संसदीय अधिवेशनाच्या आधीच ठाकरे गटाला खिंडार पडणार असल्याची, नवी माहिती समोर येत आहे. या सगळ्या घडामोडींवर आता शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले सामंत?
ऑपरेशन टायगरबाबत शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले की, मिशन हे सांगून राबवलं जात नाही. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने काम केलं. ते पाहता राज्यात असं मिशन राबवण्याची गरज नाही. तर काही लोकांना कळून चुकलंय, की बाळासाहेबांचे विचार नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे. त्यामुळे अनेक लोक संपर्कात आहेत. त्यांचा टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार हे पण निश्चित आहे, असं विधान उदय सामंत यांनी केलं.
चर्चा वाढल्या
मंत्री सामंत यांनी अशी प्रतिक्रीया दिल्यावर ऑपरेशन टायगर पुन्हा चर्चेत आलं. ठाकरे गटासह काँग्रेस आणि शरद पवार गटाचे काही आजी-माजी आमदार-खासदार फुटणार असल्याचं सूचक वक्तव्य मंत्री सामंत यांनी केलं. सामंतांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळांत चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाला आधीच गळती लागल्याने दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात बॅकफुटला गेले आहेत. अशात आता पुन्हा नवा राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाल्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण होताना दिसत आहे.
नव्वद दिवसांत भुकंप
उदय सामंत पुढे म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेणारी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात चालते, हे काही लोकांना कळून चुकलं आहे. त्यांचे अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. हे निश्चित आहे की, त्यांचा टप्प्याटप्प्याने पक्षप्रवेश होणार आहे. येत्या 90 दिवसांत हे पक्ष प्रवेश होणार असल्याचं मी सांगितलं होतं. दुसऱ्या दिवशी किंवा 24 तासांत पक्षप्रवेश होतील, असं मी म्हटलं नव्हतं. कदाचित आपला गैरसमज झाला असावा. मी इतकंच म्हटलं होतं की, येत्या 90 दिवसांत ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच 10 ते 12 माजी आमदार एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्विकारणार आहेत. यावर मी आजही ठाम आहे. अनेक लोक संपर्कात आहेत. हे मी आजही सांगतोय," अशी प्रतिक्रिया सामंत यांनी दिली आहे.












Click it and Unblock the Notifications