Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दूध का दूध होऊनच जाऊद्या... संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे पहिल्यांदाच बोलले

Dhananjay Munde on Santosh Deshmukh murder case- बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर उभ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली. विधानसभेत या प्रकरणावरुन दोन दिवसांपासून विरोधक- सत्ताधाऱ्यांमध्ये गरमागरमी सुरु आहे. या ह्त्येत मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडचे नाव आल्यापासून, अनेकांनी तर थेट मुंडे यांच्यावही शंका घ्यायला सुरुवात केलीय. ही सर्व चर्चा होत असताना मंत्री मुंडे सभागृहात दिसले नाही. आज मात्र त्यांनी या प्रकरणावर थेट उत्तर दिलं.

Dhananjay Munde

काय म्हणाले धनंजय मुंडे

धनंजय मुंडे म्हणाले, संतोष देशमुखांच्या हत्येचं समर्थन कोणीच करु शकत नाही. सर्व आरोपी अटक झाले आहेत. एसआयटी आणि सीआयडीमार्फत तपास होणार आहे. आदल्या दिवशी गुन्हेगार आहे आणि मृताचा भाऊ हॉटेलमध्ये चहा प्यायल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. तो व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे. सगळ्या गोष्टींचा तपास तपास यंत्रणेने काढणे गरजेचे आहे. ही भेट नेमकी कशासाठी होती, हेही समोर आले पाहिजे. मुंडे पुढे म्हणाले की, मी सुरुवातीपासून म्हणत आहे, हे घरातलं झालेलं भांडण आहे. त्यातून निर्घृणपणे संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे. कोण होतं, नेमकं कशावरुन भांडण झालं? घटनेच्या आदल्या दिवशी काय झालं, याचा तपास होणे गरजेचे आहे.

दुध का दुध होऊनच जाऊद्या

या प्रकऱणाची चर्चा होत होती त्यावेळी धनंजय मुंडे सभागृहात उपस्थित नव्हते. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, माझ्या सहकाऱ्याच्या संबंधांविषयी सभागृहात चर्चा सुरु होती. त्या चर्चेचे उत्तर मुख्यमंत्री देत असतील, तर परंपरेनुसार मी सदरात उपस्थित राहिलो नाही. त्या शिवाय दुसरे कुठेलेही कारण नाही. विरोधक काहीतरी बोलणार आणि त्यावर मी काहीतरी प्रत्युत्तर देणार, हे सगळं झालं असतं. नंतर मुख्यमंत्र्यांनाही उत्तर द्यायला अडचण झाली असती. हे सगळं ओळखून मी मुद्दाम सभागृहात आलो नाही. आता सगळी चौकशी होणारच आहे. जे काही असेल एकदाच काय ते दुध का दुध पानी का पानी होऊ द्या.

गुन्हेगारांबाबत मी ही कठोर

मुंडे पुढे म्हणाले, आता या प्रकरणावर मुख्यमंत्र्‍यांनी उत्तर दिले आहे. त्यामुळे सर्वांचे समाधान झाले आहे. माझ्या नावावर सदनात जे आरोप कण्यात आलेत आहे त्याचा तपास शेवटी पोलीस तपासणार आहे. पोलीस यंत्रणा आहे सीआयडीकडे तपास दिला आहेत. विरोधी पक्षनेत्यानं काय बोलावं हे मी सांगू शकत नाही... वाल्मिक नागपुरात कुठे आहे, तेही विरोधकांनी सांगावे. पोलिसांनी त्यांना पकडण्याचे काम केलं असतं. या घटनेमध्ये ज्यांनी कोणी अशा पद्धतीने हत्या केली, त्यांना सर्वांना फाशी झाली पाहिजे, ही माझी भूमिका असल्याचं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+