Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

..यापुढे आझाद मैदानावर आंदोलनास परवानगी देऊ नका! 'या' नेत्याने फोडला वादाचा बाँम्ब, संजय राऊत कडाडले

Milind Deora's letter to Fadnavis : मिलिंद देवरा यांनी यासंदर्भात एक पत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले असून त्यात आझाद मैदानासह इतर ठिकाणी निदर्शनास परवानगी देऊ नये असे म्हटले आहे.

"दक्षिण मुंबई हे केवळ आपल्या राज्याच्या प्रशासनाचे हृदयच नाही तर त्याचे राजकीय आणि आर्थिक केंद्र देखील आहे. शांततापूर्ण निदर्शने लोकशाहीचा अविभाज्य भाग असली तरी, त्यांचे स्थान आणि व्याप्ती सरकार, नगरपालिका प्रशासन, सुरक्षा दल किंवा खाजगी क्षेत्राच्या कार्याला बाधा पोहोचवू नये. म्हणून अशा निदर्शनांना दक्षिण मुंबईच्या उच्च-सुरक्षा, उच्च-कार्यक्षम क्षेत्रांपासून दूर स्थलांतरित करण्यासाठी किंवा प्रतिबंधित करण्यासाठी आवश्यक पावले उचलावी अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) नेते मिलिंद देवरा यांनी केली आहे. यावर शिवसेना (युबीटी) नेते तथा खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे.

Milind Deora s letter to Devendra Fadnavis

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यांनी यासंदर्भात एक पोस्ट आणि मिलिंद देवरांचे पत्रच जारी केले आहे. संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, अमित शहा पुरस्कृत शिंदे गटाचा हाच खरा चेहरा आहे; मुंबईत मराठी माणूस त्यांच्या न्याय्य मागण्यासाठी एकवटला याची पोटदुखी उघड झाली आहे. शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईत मराठी माणसाच्या आंदोलनास परवानगी देऊ नये असे मुख्यमंत्र्याना लिहिले आहे, त्यांनी बाळासाहेबांचा फोटो वापरणे बंद करायला हवे असेही आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

काय आहे मिलिंद देवरांचे पत्र?

मिलिंद देवरा यांच्या पत्रात म्हटले की, "आदरणीय फडणवीस जी मी तुम्हाला दक्षिण मुंबईतील आझाद मैदान आणि इतर ठिकाणी वारंवार होणाऱ्या निदर्शने आणि मोठ्या मेळाव्यांबद्दल खोलवर चिंता व्यक्त करत लिहित आहे. निदर्शने करण्याचा अधिकार हा एक आवश्यक लोकशाही स्वातंत्र्य असला तरी, तो सामान्य नागरिकांच्या व्यत्ययाशिवाय जगण्याच्या आणि काम करण्याच्या अधिकारांशी संतुलित असला पाहिजे."

मिलिंद देवरा त्यांच्या पत्रात पुढे नमूद करतात की, "दक्षिण मुंबई हे केवळ आपल्या राज्याच्या प्रशासनाचे हृदयच नाही तर त्याचे राजकीय आणि आर्थिक केंद्र देखील आहे. येथे महाराष्ट्र सरकारचे सचिवालय (मंत्रालय), विधानसभा, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची कार्यालये तसेच
पश्चिम नौदल कमांड आहे. हे वित्तीय संस्था, कॉर्पोरेट मुख्यालय आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे केंद्र आहे ज्यावर लाखो लोक दररोज अवलंबून असतात."

"दक्षिण मुंबई हे केवळ आपल्या राज्याच्या प्रशासनाचे हृदयच नाही तर त्याचे राजकीय आणि आर्थिक केंद्र देखील आहे. शांततापूर्ण निदर्शने लोकशाहीचा अविभाज्य भाग असली तरी, त्यांचे स्थान आणि व्याप्ती सरकार, नगरपालिका प्रशासन, सुरक्षा दल किंवा खाजगी क्षेत्राच्या कार्याला बाधा पोहोचवू नये. म्हणून मी महाराष्ट्र सरकारला अशा निदर्शनांना दक्षिण मुंबईच्या उच्च-सुरक्षा, उच्च-कार्यक्षम क्षेत्रांपासून दूर स्थलांतरित करण्यासाठी किंवा प्रतिबंधित करण्यासाठी आवश्यक पावले उचलावी अशी मागणी शिवसेना (शिंद गट) नेते मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे.

"जगातील कोणतेही राजधानी शहर आपल्या प्रशासन, सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य संस्थांना निदर्शनांमुळे वारंवार अपंग होऊ देत नाही. शांततापूर्ण निदर्शने लोकशाहीचा अविभाज्य भाग असली तरी, त्यांचे स्थान आणि व्याप्ती सरकार, नगरपालिका प्रशासन, सुरक्षा दल किंवा खाजगी क्षेत्राच्या कार्याला बाधा पोहोचवू नये. म्हणून मी महाराष्ट्र सरकारला अशा निदर्शनांना दक्षिण मुंबईच्या उच्च-सुरक्षा, उच्च-कार्यक्षम क्षेत्रांपासून दूर स्थलांतरित करण्यासाठी किंवा प्रतिबंधित करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची विनंती करतो. यामुळे नागरिकांचे हक्क संरक्षित राहतील, प्रशासन अखंड राहील आणि मुंबई महाराष्ट्र आणि भारताची निर्विवाद आर्थिक आणि राजकीय राजधानी म्हणून कार्यरत राहील याची खात्री होईल."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+